Elon Musk Per Minute Income: जगात मोठ्या प्रमाणात गरीब आणि श्रीमंत यांच्यात दरी आहे. श्रीमंत असणाऱ्यांची संपत्ती दिवसेंदिव वाढत आहे, तर गरिबांची गरिबी वाढतच आहे. दरम्यान, जगातील पहिल्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk)  यांचे एकूण उत्पन्न तुम्हाला माहित आहे का? किंवा प्रति मिनिट त्यांचे उत्पन्न  किती? याबाबत तुम्हाला माहित आहे का? तर करोडो भारतीयांच्या एका वर्षाच्या पगारापेक्षा एलन मस्क यांचे उत्पन्न जास्त आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. 


एलन मस्क दर मिनिटाला 5,71,659 रुपये कमावत


एलन मस्क दर सेकंदाला, मिनिटाला, तासाला आणि दिवसाला प्रचंड कमाई करतो. टेक अब्जाधीश एलन मस्क दर मिनिटाला अंदाजे 6887 डॉलरची कमाई करतो. दर तासाला 4,13,220 डॉलर, तर दररोज 99,17,280 डॉलरची कमाई करतो. तर दर आठवड्याला 6,94,20,960 डॉलरची कमाई करतो. प्रति सेकंद कमाईची गणना करण्यासाठी, त्यांची एकूण कमाई एका वर्षातील सेकंदांच्या संख्येने भागली (31,536,000), तर अंदाजे 114.80 डॉलर प्रति सेकंद इतका आकडा आहे. भारतीय रुपयात, एलन मस्क प्रत्येक सेकंदाला 9529 रुपये कमावतो. दर मिनिटाला तो 5,71,659 रुपये म्हणजेच साडेपाच लाख रुपयांहून अधिक कमावतो. भारतातील करोडो पगारदार कामगारांचे वार्षिक पॅकेजही तेवढे नसते.


एलन मस्कची एकूण संपत्ती 198.9 अब्ज डॉलर्स


फिनबोल्डने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, फेब्रुवारी 2024 च्या मध्यापर्यंत, एलन मस्कची एकूण संपत्ती 198.9 अब्ज डॉलर्स असल्याचे सांगण्यात आले आहे. फोर्ब्सच्या रिअलटाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार हा आकडा घेण्यात आला आहे. त्यावेळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून दुसऱ्या स्थानावर घसरण होऊनही, मस्कची कमाई अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त होती. 


अनेक कंपन्यांमधील समभागांच्या आधारे एकूण संपत्तीचे मोजमाप


एलन मस्कची एकूण संपत्ती अनेक कंपन्यांमधील त्यांच्या समभागांच्या आधारे मोजली जाते. त्याची टेस्लामध्ये 20.5 टक्के, स्टारलिंकमध्ये 54 टक्के, स्पेसएक्समध्ये 42 टक्के, एक्समध्ये अंदाजे 74 टक्के, द बोरिंग कंपनीमध्ये 90 टक्क्यांहून अधिक आणि XAIमध्ये 25 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. एलन मस्क याच्याकडे न्यूरालिंकमध्ये 50 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे.


अहवालात दिलेल्या माहितीनुसार, अब्जाधीशांच्या जगात, एलन मस्कला जागतिक लक्झरी वस्तू कंपनी LVMH चे मालक आणि सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्याकडून कठीण स्पर्धेचा सामना करावा लागतो. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत, बर्नार्ड अर्नॉल्ट, जगातील पहिल्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची संपत्ती 219.1 अब्ज डॉलर होती. ते पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तर  Amazon चे संस्थापक जेफ बेझोस हे देखील 192.5 अब्ज डॉलर संपत्तीचे मालक आहेत.  Meta चे संस्थापक आणि CEO मार्क झुकरबर्ग 166.6 अब्ज डॉलर संपत्तीचे मालक आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


Twitter: आता वापरता येणार अॅड फ्री ट्विटर, कंपनी आणतेय नवं सबस्क्रिप्शन मॉडेल; एलन मस्क यांचा नवा प्लान काय?