Do these things to get Laxmi Blessings : शुक्रवारचा दिवस हा विशेषतः धनसंपत्तीची देवी लक्ष्मीला (Laxmi) समर्पित आहे. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारचा दिवस सर्वात योग्य मानला जातो. शास्त्रांमध्ये, देवी लक्ष्मीचं वर्णन सुख, समृद्धी आणि भौतिक संपत्ती देणारी देवता म्हणून करण्यात आलं आहे. यात जर तुम्ही लक्ष्मीच्या वाराच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी काही खास उपाय केले तर तुमच्या जीवनातील समस्या दूर होऊ शकतात आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी नेमके कोणते उपाय करावे? जाणून घेऊया.


लक्ष्मीच्या कृपेसाठी शुक्रवारी करा 'हे' खास उपाय (Do these remedies to get laxmi's blessings)


आनंदी आयुष्यासाठी


जीवनात सुखाची भरभराट व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही शुक्रवारी बाजारातून कमळाच्या फुलावर बसलेल्या लक्ष्मीचा फोटो आणा आणि आपल्या देव्हाऱ्यात स्थापित करा. यानंतर देवीला फुलं अर्पण कर आणि नंतर दिवा, अगरबत्ती लावून देवीची पूजा करा. शुक्रवारी असं केल्याने तुमच्या जीवनात आनंदीआनंद येईल.


सौभाग्य सुख वाढवण्यासाठी


जर तुम्हाला सौभाग्य सुख वाढवायचं असेल तर शुक्रवारी एक रुपयाचं नाणं घेऊन तुमच्या देव्हाऱ्यात देवी लक्ष्मीसमोर ठेवा.आता त्यानंतर देवी लक्ष्मीची योग्य प्रकारे पूजा करा. त्यानंतर त्या नाण्याची देखील त्याच पद्धतीने पूजा करा आणि शुक्रवारी दिवसभर ते नाणं देव्हाऱ्यात ठेवा. दुसऱ्या दिवशी ते नाणं उचलून लाल कपड्यात बांधून ठेवा. शुक्रवारी हा उपाय केल्यास तुमचं सौभाग्य सुख वाढेल.


उत्तम आरोग्यासाठी


उत्तम आरोग्यासाठी शुक्रवारी लक्ष्मी मंदिरात शंख अर्पण करावा. तसेच देवीला तूप आणि नैवेद्य अर्पण करावा आणि हात जोडून उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी. शुक्रवारी हा उपाय केल्याने तुमचं आरोग्य चांगलं राहील.


संपत्ती वाढवण्यासाठी


जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल तर शुक्रवारी एक लहान मातीचं भांडं घेऊन त्यात तांदूळ टाका. तांदळाच्या वर एक रुपयाचं नाणं आणि हळकूंड ठेवा. आता त्यावर झाकण ठेवून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घ्या आणि एखाद्या मंदिराच्या पुजाऱ्याला ते तांदूळ दान करा. शुक्रवारी हे केल्याने तुमच्या संपत्तीमध्ये खूप वाढ होईल.


महत्त्वाचं काम पार पाडण्यासाठी


जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या करारासाठी शुक्रवारी कुठेतरी बाहेर जात असाल आणि तुम्हाला त्यात यश मिळवायचं असेल, तर शुक्रवारी घराबाहेर पडताना सर्वप्रथम देवी लक्ष्मी नमस्कार करून तिचा आशीर्वाद घ्यावा. त्यानंतर दही-साखर खाऊन घराबाहेर पडा. शुक्रवारी असं केल्याने तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल.


व्यवसायात आर्थिक लाभ मिळवण्यासाठी


जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात आर्थिक लाभ मिळवायचा असेल, जर तुम्हाला तुमचा व्यवसाय खूप पुढे न्यायचा असेल तर, शुक्रवारी अंघोळ वगैरे केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आसनावर बसून देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा.
मंत्र - ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीध प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मीय नमः।
या मंत्राचा किमान 11 वेळा जप करावा. शुक्रवारी हा उपाय केल्यास तुम्हाला तुमच्या व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल.


घरातील तिजोरी नेहमी भरलेली राहावी यासाठी


तुमच्या घरातील तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली असावी आणि तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असावी असं वाटत असेल, तर त्यासाठी शुक्रवारी अंघोळ केल्यानंतर एका भांड्यात थोडी हळद घेऊन पाण्यात मिसळा आणि पेस्ट बनवा. आता या हळदीने घराच्या बाहेरील मुख्य गेटच्या दोन्ही बाजूला जमिनीवर लहान-लहान पावलांचे ठसे बनवा. त्यानंतर गेटच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि देवी लक्ष्मीची पूजा करा, शुक्रवारी हे उपाय केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची तिजोरी नेहमी धनाने भरलेली राहील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Shani Dev : शनिवारी शनिदेवाच्या 108 नावांचा करा जप; संपेल कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव, सर्व समस्या होतील दूर