Health insurance rule : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Minister Nirmala Sitharaman) या 1 फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. यापूर्वीच आरोग्य विम्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. कोट्यावधी आरोग्य विमा पॉलिसीधारकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. त्यांना आता कॅशलेस विमा दावा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळं नेटवर्कमध्ये नसलेल्या ठिकाणी पण त्यांना कॅशलेसची सुविधा देखील मिळणार आहे. सर्व रुग्णालयांमध्ये आता कॅशलेस सुविधा मिळणार आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 


आरोग्य विमा घेतलेल्या व्यक्तीचा त्रास कमी होणार


आरोग्य विमा घेतलेल्या व्यक्तीला नेटवर्क नसलेल्या रुग्णालयात उपचार घेत असेल तर त्याला कॅशलेसचा लाभ मिळत नव्हता. त्याला अगोदर रक्कम भरावी लागत होती. त्यानंतरच रिइंबरमेंटची प्रक्रिया पूर्ण होत होती. त्यामुळं उपचारादरम्यान त्याच्यावर आर्थिक बोजा वाढत होता. तसेच अनेकदा विमा कंपन्या रुग्णालयातील खर्च पण अमान्य करतात. तो मोठा आर्थिक बोजा ग्राहकांवर पडत होता. अनेकदा दावा केल्यानंतर कित्येक महिने रक्कम काही खात्यात जमा होत नाही. पण आता हा सर्व त्रास गायब होणार आहे. देशातील प्रत्येक आरोग्य विमाधारकाला, कोणत्याही रुग्णालयात कॅशलेसची सुविधा मिळणार आहे. याचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.


48 तासांपूर्वी विमा कंपनीला द्यावी लागणार उपचारांची माहिती


जनरल इन्शुरन्स काऊन्सिल ही देशातील सर्व विमा कंपन्यासोबत याबाबत चर्चा करत आहे. त्यानुसार, प्रत्येक आरोग्य विमाधारकाला कॅशलेस उपचार सुविधेचा फायदा देणे हा उद्देश आहे. विमा कंपनीच्या यादीत संबंधित रुग्णालय नसले तरी विमाधारकाला विनारोख उपचार देण्यासंबंधी सहमती तयार करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व विमा कंपन्यांशी युद्धपातळीवर चर्चा सुरु आहे. दरम्यान, ही सुविधा घेण्यासाठी काही अटींचे पालन करावं  लागणार आहे. 'कैशलेस एव्हरीव्हेयर' या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पॉलिसीधारकाला कमीतकमी 48 तासांपूर्वी त्याच्या विमा कंपनीला उपचारांची माहिती द्यावी लागेल. तर आपत्कालीन स्थितीत रुग्ण अथवा त्याच्या नातेवाईकांना विमा कंपनीला 48 तासांच्या आत उपचारासाठी कोणत्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, याची माहिती द्यावी लागणार या नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. दरम्यान, हे नियम कधीपासून अंमलात येणार याबाबत विमा परिषदेने काहीच जाहीर केले नाही. सध्या देशातील 63 टक्के आरोग्य विमा पॉलिसीधारक कॅशलेस क्लेमचा पर्याय निवडतात.


आरोग्य विम्याचे फसवे दावे कमी होणार


सध्या, 63 टक्के ग्राहक कॅशलेस दाव्यांची निवड करतात तर इतरांना प्रतिपूर्ती दाव्यांसाठी अर्ज करावा लागतो. जर एखादा ग्राहक त्याच्या उपचारासाठी नेटवर्क नसलेल्या हॉस्पिटलमध्ये गेला तर त्याला आधी पैसे द्यावे लागतात आणि नंतर त्याच्या विम्यामधून त्याची परतफेड करावी लागेल. अशा प्रकरणांमध्ये, विमा दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याची जबाबदारी पूर्णपणे ग्राहकावर असते. नॉन पॅनेल हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार ही प्रत्येकासाठी एक चांगली बाब आहे. या उपक्रमामुळं आरोग्य विम्याचे फसवे दावे कमी होतील. तसेच विमाधारकांवरील खर्चाचा भार कमी होईल. 


महत्त्वाच्या बातम्या:


रिलायन्सचा नवा आरोग्य विमा, जगात कुठेही घ्या उपचार; कंपनी देणार 8.3 कोटी रुपयांचा विमा