Medicine Rate: केंद्र सरकारनं (Central Govt) सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारनं अनेक औषधांचे दर (Medicine Rate) कमी करण्याचा निर्णय घेतलाय. ताप, संसर्ग, कोलेस्ट्रॉल, शुगरसह 100 औषधे स्वस्त होणार आहेत. NPPA म्हणजेच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने 69 नवीन फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत आणि 31 ची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. यामुळं औषधांच्या दर कमी होणार आहेत.
देशात आजारांवर उपचार करणे खूप महाग होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय. कोलेस्टेरॉल, शुगर, अंगदुखी, ताप, संसर्ग, अतिरक्तस्राव, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी3, लहान मुलांची अँटिबायोटिक्स यासह 100 औषधे स्वस्त होतील. यामुळं लोकांचा आरोग्यसेवेवरचा खर्च कमी होणार आहे.
नेमका नवीन निर्णय काय?
NPPA India ने 69 नवीन फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत आणि 31 ची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. त्याबाबत अधिसूचना देखील जारी केली आहे. भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत फार्मास्युटिकल्स विभागाच्या NPPA ने ही अधिसूचना जारी केली आहे.
'या' आजारांवरील औषधे होणार स्वस्त
कोलेस्टेरॉल, मधुमेह, वेदना, ताप, संसर्ग, अतिरक्तस्त्राव थांबवणे, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी3, लहान मुलांसाठी अँटीबायोटिक्स यासह अँटीवेनम औषधेही स्वस्त होतील. सर्पदंशावर उपचार करण्यासाठी अँटीवेनमचा वापर केला जातो. NPPA च्या नवीन ऑर्डरमुळे 100 औषधे स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला
NPPA जाणून घ्या
NPPA ही एक भारत सरकारची संघटना आहे. जी ड्रग्ज (किंमत नियंत्रण) ऑर्डर अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. औषध धोरणात बदल किंवा सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारला सल्ला देणे आणि नियमन केलेल्या औषधांच्या किमतींवर लक्ष ठेवणे हे संघटनेचे काम आहे. भारत सरकारच्या 29 ऑगस्ट 1997 च्या ठरावानुसार राष्ट्रीय फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ची स्थापना करण्यात आली. औषधोपचार (किंमत नियंत्रण) आदेशाच्या तरतुदींची अंमलबजावणी करणे आणि त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांनुसार अंमलबजावणी करण्याचं काम ही संघटना करते. प्राधिकरणाच्या निर्णयांमुळं उद्भवणाऱ्या सर्व कायदेशीर बाबी हाताळणे.औषधांच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवण्यासाठी, कमतरता असल्यास ओळखा आणि उपाययोजना करण्याचं कामही या संघटनेद्वारे केलं जातं. मोठ्या प्रमाणात औषधे आणि फॉर्म्युलेशनसाठी उत्पादन, निर्यात आणि आयात, वैयक्तिक कंपन्यांचा बाजारातील हिस्सा, कंपन्यांची नफा इत्यादींवरील डेटा संकलित करण्याचं काम केलं जातं.
महत्वाच्या बातम्या: