मुंबई: देशातील सर्वात मोठी खासगी बँक असणाऱ्या एचडीएफसीने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर इनसायडर ट्रेडिंग नियमांच्या उल्लंघन प्रकरणी 10.20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी जिमी टाटा यांनी शेअर्सची केलेली विक्री ही बँकेच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे सांगण्यात आलंय.
संबंधित व्यवहार हा नजरचुकीने झाल्याचेही एचडीएफसी बँकेने स्पष्ट केलं. बँकेने या संबंधी शेअर मार्केटला माहिती देताना प्रसिध्द केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की, "हा व्यवहार नजरचुकीने झाल्याचा निष्कर्ष बँकेच्या ऑडिट समितीने निष्कर्ष काढला आहे. यामध्ये बँक कोड (Bank’s Code)आणि सेबीच्या इनसायडर ट्रेडिंग, 2015 (SEBI-Prohibition of Insider Trading Regulations, 2015) नियमांचे उल्लंघन करण्याचा कोणताही उद्देश नव्हता."
RBI ची मोठी कारवाई, उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन्स रद्द
एचडीएफसीचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्ज विभागाचे मुख्य असलेल्या जिमी टाटा यांनी त्यांच्याकडे असलेल्या बँकेच्या मालकीच्या 1,400 शेअर्सची विक्री केली होती. बँकेने ही विक्री चुकून झालेला व्यवहार असल्याचं स्पष्ट केलंय.
हा व्यवहार नजरचुकीने झाला असल्याचं बँकेनं सांगितलं असलं तरी यामध्ये बँकिंग कोड आणि पीआयटी नियमांचे (PIT Regulations) उल्लंघन केल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे जिमी टाटा यांना 10.20 लाखांचा दंड लावण्याचा निर्णय एचडीएफसी बँकेने घेतला आहे. पीआयटी नियमांनुसार दंडाची ही रक्कम गुंतवणूक सुरक्षा आणि शिक्षण फंडात (IPEF) जमा करण्यात येईल.
RBI ची मोठी कारवाई, उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन्स रद्द
एचडीएफसी बँकेने नुकतेच चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर मध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीची घोषणा केली आहे. यामध्ये बँकेच्या फायद्यात 14.36 टक्क्यांची वाढ झाली असून ती 8,760 कोटी रुपयांवर पोहचली आहे.