Air India : टाटा समूहानं ताब्यात घेतल्यानंतर एअर इंडियामध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. एअरलाइनने ऑगस्टमध्ये आपला नवीन लोगो जारी केला होता. आता त्यानंतर विमानचा नवीन लूक सर्वांसमोर आला आहे. या विमानाचा फर्स्ट लुक जारी करण्यात आला आहे. हा फर्स्ट लुक फ्रान्समधून दाखवण्यात आला आहे. 


यंदाचा हिवाळा खास असणार आहे. खासकरून एअर इंडिया टाटा समूहात गेल्यानंतर परिवर्तन होत आहे. एअर इंडियाचे नवीन डिझाइन केलेले विमान या हिवाळ्यात भारतात येण्यास सुरुवात होईल. काही महिन्यांपूर्वीच एअर इंडियाने आपला नवीन लोगो जारी केला होता, आता त्याच्या नव्या डिझाइन केलेल्या विमानाचा फर्स्ट लुक समोर आला आहे. एअर इंडियाने 470 नवीन विमानांची ऑर्डर दिली आहे. तर ती आपल्या संपूर्ण ताफ्याला अपग्रेड करण्यासाठी सुमारे 3320 कोटी रुपये खर्च करत आहे. यामध्ये विमानांच्या आतील भागात बदल करणे आणि बाहेरील भागाला नवीन स्वरूप देणे यांचा समावेश आहे. यासोबतच विस्ताराची विमानेही एअर इंडियाच्या रंगात रंगली आहेत, कारण दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे.




फ्रान्समधून एअर इंडियाचा नवा लूक 


एअर इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्टीवटरवर आपल्या नवीन डिझाइन केलेल्या विमानाचा फर्स्ट लुक जारी केला. कॅप्शन दिलेले आहे की हा नवीन Airbus A350 चा पहिला लूक आहे. तो Toulouse, France मध्ये तयार केला जात आहे. यावर्षी हिवाळ्यात ही विमाने भारतात येण्यास सुरुवात होणार आहे. 


एअर इंडियाचा नवीन लोगो 'द व्हिस्टा' खास 


जेव्हा एअर इंडियाने ऑगस्टमध्ये आपला नवीन लोगो ‘द व्हिस्टा’ लाँच केला. त्यानंतर एअर इंडियाचे लाल आणि पांढरे मूळ रंग कायम ठेवण्यात आले. तसेच एअर इंडियाच्या जुन्या गोल्डन विंडो आणि गोल्ड स्टँडर्डला महत्त्व देत त्यात सोनेरी ठळक वैशिष्ट्ये देण्यात आली. याशिवाय, जांभळा रंगही  त्यात जोडला गेला आहे, जो कदाचित विस्तारासोबत विलीन होण्याचे प्रतीक आहे. यासोबतच नवीन लोगोमध्ये एक वर्तुळ देखील आहे.


2025 पर्यंत एअर इंडियाची सर्व विमाने नवीन रंगात सजणार


टाटा सन्सचे तत्कालीन अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले होते की, नवीन लोगो अमर्याद शक्यता आणि आमचा आत्मविश्वास दर्शवतो. यावरून हे दिसून येते की एअर इंडियाला सुधारण्याचा मार्ग कठीण आहे, परंतु आम्हाला कुठे जायचे आहे हे आम्हाला ठाऊक आहे आणि हे आमचे धाडसी दृष्टीकोन प्रतिबिंबित करते.


महत्त्वाच्या बातम्या:


Air India News: इंडिगोनंतर आता एअर इंडियाचा एअरबस-बोईंगशी करार, 470 नवीन विमानं खरेदी करणार