वसई : कॅनडातील (Canada) व्हँकुव्हर जवळ विमान अपघातात (Plane Crash) दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तीन जण ठार झाले आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेले दोन्ही प्रशिक्षणार्थी वैमानिक मुंबईतील असल्याचे वृत्त आहे. त्यातील अभय गाद्रू हा 25 वर्षीय युवक वसईच्या (Vasai) एव्हरशाईन येथील कृष्णा वंदन या सोसायटीत राहणारा आहे. या घटनेनंतर संपूर्ण सोसायटीवर शोककळा पसरली आहे. कॅनडातील व्हँकुव्हर जवळ शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी चिलीवॅक, बी.सी. येथे लहान विमान कोसळल्याने दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह तीन जणांना आपला जीव गमवाला. मिळालेल्या माहितीनुसार,   झाडावर विमान आदळल्यामुळे हे विमान कोसळले. अपघातात मृत्युमुखी पडलेले दोन्ही प्रशिक्षणार्थी वैमानिक मुंबईतील असल्याची माहिती समोर आली होती.


अगदी काहीच दिवसांत तो परतणार होता


अभयचे वडिल अनिल गाद्रू हे मेडिकल रिप्रेझेन्टीव म्हणून नोकरी करतात. तर त्याची आई भवानी या शिक्षिका आहेत. त्या नुकत्याच निवृत्त झाल्या होत्या. सध्या दोघे ही दिल्लीला आपल्या नातेवाईकांकडे गेले आहेत. तर अभयचा 23 वर्षाचा छोटा भाऊ चिराग हा ही कॅनडाला आहे. तेथे तो मॅनेजमेंटची अभ्यास करत आहे. अभय आपलं प्रशिक्षण पूर्ण करुन, 25 ऑक्टोंबर पर्यंत वसईत परत येणार होता. 


मनमिळाऊ स्वभावाचा अभय


अत्यंत मितभाषी, मनमिळाऊ स्वभावामुळे संपूर्ण सोसायटीचा अभय लाडका होता. विनोद करण्यात दुस-यांना हसवण्यात त्यांचा हातखंडा होता. त्याला बाईक चालवणं फार आवडतं होतं.  कॅनेडातून आल्यावर आपल्या सोसायटीतील मिञ मैञीणी बरोबर गप्पागोष्टींमध्ये तो रमायचा. सोसायटीच्या प्रत्येक कार्यक्रमात तो उत्सहाने सहभाग नोंदवायचा.त्याच्या अशा प्रकारे जाण्याची गोष्ट सोसायटीमधील कोणालाच अजूनही पचवता आलं नाही.  तर अजूनही आपल्याच असल्याची भावना त्याच्या सोसायटीमधील लोकांनी व्यक्त केली आहे. 


नेमंक काय झालं?


पायपर पीए-34 सेनेका हे दुहेरी इंजिन असलेले हलके विमान चिलीवॅक शहरातील मोटेलच्या मागील झाडांवर आदळून हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. यामध्ये  दोन भारतीयांसह (Indians) तिघांचा मृत्यू झाला आहे.विमान एका झाडावर आदळल्यने हा अपघात झाला. त्यानंतर हे दुर्घटनाग्रस्त विमान हॉटेल इमारतीच्या मागे कोसळलं. या दुर्घटनेत दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा दुर्दैवी अंत झाला असून त्यांची नावे अभय गाद्रू आणि यश विजय रामुगाडे अशी आहेत.


हेही वाचा : 


Canada Plane Crash : कॅनडामध्ये विमान कोसळलं अपघातात दोन भारतीय शिकाऊ पायलटचा मृत्यू, आणखी एकाचा समावेश