Happy Birthday Nita Ambani : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नीता अंबानी (Mukesh Ambani Wife Nita Ambani) कधी त्यांच्या समाजकार्य (Social Work) मुळे आणि हटके स्टायलिश लूक (Stylish Look) साठी ओळखल्या जातात. नीता अंबानी यांचा आज 60 वा वाढदिवस (Nita Ambani Birthday) साजरा आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या खास निमित्त आम्ही तुम्हाला नीता अंबानी यांचं आयुष्य (Nita Ambani Life) आणि त्यांच्या शिक्षण (Nita Ambani Eductaion) याबाबत माहिती देणार आहोत.
नीता अंबानी यांचा 60 वा वाढदिवस
नीता अंबानी (Nita Ambani Qualification) यांचं प्राथमिक शिक्षण (Primary Education) रोज मॅनर गार्डनमधून झालं आहे. त्यांनी पुढील शिक्षण मुंबईच्या नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स (Narsee Monjee College of Commerce and Economics) मधून पूर्ण केलं आहे. अभ्यासासोबतच त्यांना नृत्याचीही खूप आवड आहे. लग्नानंतर त्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यानंतर त्या धीरूभाई अंबानी शाळेचे संस्थापिका झाल्या.
नीता अंबानींचं शिक्षण किती माहितीय?
नीता अंबानी यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1963 रोजी मुंबईतील गुजराती कुटुंबात झाला. त्यांनी नीता अंबानी यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली आहे. रवींद्रभाई दलाल आणि पूर्णिमा दलाल (Ravindrabhai Dalal and Purnima Dalal) हे नीता अंबांनी यांचे आई-वडील. नीता अंबानी यांनी मुंबईच्या नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. याशिवाय नीता अंबानी या भरतनाट्यमच्या प्रशिक्षित नृत्यांगनाही आहेत. त्यांनी भरतनाट्यममधील नृत्यकौशल्यही अनेक प्रसंगी दाखवून दिलं आहे.
समायकार्य आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत
मुकेश अंबानी पत्नी निता अंबानी या कायम चर्चेत असतात. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक नीता अंबानी त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जातात. या फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात अखंड कार्यरत आहेत. रिलायन्स फाऊंडेशनच्या 'धीरूभाई अंबानी शिष्यवृत्ती कार्यक्रमा'द्वारे 12,776 हून अधिक मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :