GST:  देशात ब्रेडपासून ते अनेक जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लागू (GST Hike) झाला आहे. जीएसटी लागू झाल्याने अनेक सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडून पडले आहे. घरभाडे, विवाह सोहळ्यावरदेखील जीएसटी लागू झाला आहे. घरभाडेसाठी जीएसटी लागू करण्यासाठी काही अटी आहेत. त्यामुळे सरसकटपणे जीएसटी लागू होणार नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 


घरभाड्यासाठी कोणाला द्यावा लागणार जीएसटी 


घरभाड्यावरील जीएसटीसाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार, जीएसटी आकारला जाणार आहे.  ज्यांच्याकडे अधिकृत जीएसटी नंबर आहे त्याच भाडेकरूंना आपल्या घर भाड्यावर 18 टक्के जीएसटी लागणार आहे. नियमांनुसार, जीएसटी अंतर्गत नोंदणी असणारी व्यक्ती जर भाडेतत्वावर घर घेत असेल तर जीएसटी भरावा लागणार आहे. आतापर्यंत हा नियम फक्त व्यावसायिक मालमत्तेसाठी लागू होता. हा जीएसटी भरणाऱ्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम केल्यानंतर कर सवलत मिळेल. भाडेतत्वावर घर खासगी वापरासाठी घेतले असल्यास त्यावर जीएसटी लागू होणार नाही. त्याशिवाय, जर घर भाडेतत्वावर घेणारे व्यावसायिक, कंपनी अथवा व्यक्ती जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत नसतील तर त्यांना कर भरावा लागणार नाही.


10 लाखांवरील विवाह सोहळ्यावर 1.5 लाखांचा जीएसटी 


भारतात दिवाळीच्या दरम्यान विवाहाचा मोसम सुरू होतो. मात्र, आता लग्नासाठी 10 लाखांचा खर्च केल्यास  1.5 लाख रुपयांचा जीएसटी भरावा लागेल. दिवाळीनंतर होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी मॅरेज हॉल, मंडप, कॅटरर्स, वगैरेंसाठी आधीच बुकिंग करण्यात आली आहे. यासाठी आधी काही रक्कम भरावी लागते. त्यानंतर विवाह सोहळ्याआधी अथवा त्या दरम्यान उर्वरित रक्कम भरावी लागते. 


एखाद्या विवाह सोहळ्यासाठी विविधझ सेवांसाठी 10 लाख रुपयांचा खर्च केल्यास त्यापैकी जवळपास 1.5 लाख रुपयांहून अधिक रक्कम जीएसटी म्हणून द्यावी लागणार आहे. सर्वाधिक जीएसटी ही विवाह सोहळ्यासाठीच्या गार्डनसाठी आहे. एक लाखाच्या मंडपासाठी 18 हजार जीएसटी मोजावा लागतो. तर, 1.5 लाखापर्यंतच्या कॅटरिंग सेवेसाठी तुम्हाला 27 हजारांचा जीएसटी भरावा लागेल. 


त्याशिवाय, सजावट, बँड बाजा, फोटो व्हिडिओ, घोडा-बग्गी वगैरेच्या सेवांवरही 18 टक्के जीएसटी आहे. तर, लग्नासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूंवरही याआधीच जीएसटी लागू करण्यात आली आहे. कपडे, फूटवेअरसाठी 5 ते 12 टक्क्यांपर्यत जीएसटी लागू होतो. तर, सोन्याच्या दागिन्यांसाठी 3 टक्के जीएसटी लागू होतो. याचाच अर्थ तीन लाखांचे दागिने खरेदी केल्यास तुम्हाला सहा लाख रुपये जीएसटी म्हणून द्यावे लागतील.