मुंबई : आजपासून (25 जून) एकूण 96,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्य असलेल्या ध्वनिलहरींचा लिलाव (Spectrum Auction) आजपासून चालू होणार आहे. दूरसंचार क्षेत्रातील रिलायन्स जिओ (Reliance Jio), भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडीया या कंपन्या लिलाव प्रक्रियेत एकमेकांच्या स्पर्धक असतील. सध्या देशभरात पसरलेल्या 5 जी मोबाइल सेवांसाठी या ध्वनीलहरी मिळवण्यासाठी वरील प्रत्येक कंपन्यांची धडपड असेल. याआधी ध्वनिलहरींची लिलाव प्रकिया 2022 सालातील ऑगस्ट महिन्यात झाली  होती. या लिलाव प्रक्रियेत पहिल्यांदाच 5जी सेवेसाठीच्या (5 G Internate) ध्वनीलहरींचा समावेश करण्यात आला होता. 


कोणकोणत्या ध्वनीलहरींचा समावेश


केंद्र सरकार आता साधारण 96,317 कोटी रुपयांच्या महसुलाच्या अपेक्षेसह एकूण आठ स्पेक्ट्रम बँडमध्ये या ध्वनीलहरींचा लिलाव करणार आहे. या लिलावात  800 मेगाहर्ट्झ, 900 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्झ, 2100 मेगाहर्ट्झ, 2300 मेगाहर्ट्झ, 2500 मेगाहर्ट्झ, 3300 मेगाहर्ट्झ आणि 26 गीगाहर्ट्झ अश प्रकारच्या ध्वनीलहरींचा समावेश आहे.


मोबाईल बँड्स आणखी स्ट्राँग होणार 


आईटीयू-एपीटी फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भारत भाटिया यांनी या ध्वनिलहरींच्या लिलावावर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सरकारकडून केल्या जाणाऱ्या 800 मेगाहर्ट्झ, 900 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्झ, 2100 मेगाहर्ट्झ, 2300 मेगाहर्ट्झ, 2500 मेगाहर्ट्झ, 3300 मेगाहर्ट्झ आणि 26 गीगाहर्ट्झ ध्वनीलहरींच्या लिलावाच्या निर्णयाचे स्वागत करतो. पण यासोबतच 600 मेगाहर्ट्झ आणि 1400 मेगाहर्ट्झ या ध्वनीलहरींचाही लवकरात लवकर लिलाव होणे गरजेचे आहे. कारण मोबाईल क्षेत्रातील उद्योगांसाठी या ध्वनीलहरी फार महत्त्वाच्या आहेत, असे मत भारत भाटिया यांनी व्यक्त केले.


रिलायन्स जिओ घेणार लिलावात सहभाग 


रिलायन्स जिओ (Reliance Jio) ही दूरसंचार कंपनीदेखील या लिलावात सहभाग घेणार आहे. त्यासाठी जिओने साधारण 3000 कोटी रुपयांची रक्कम सरकारदरबारी अग्रीम ठेव म्हणून जमा केली आहे. दूरसंचार विभागानुसार भारती एअरटेलने (Bharti Airtel) 1050 कोटी रुपये, व्होडाफोन आयडिया (व्हीआयएल)ने 300 कोटी रुपयांची अग्रीम ठेव जमा केली आहे. दूरसंचार कंपन्यांनी ठेवलेल्या अग्रीम रकमेच्या आधारावर या कंपन्यांच्या आगामी रणनीतीचा अंदाज लावला जाऊ शकतो. त्यामुळे या लिलाव प्रक्रियेत जिओ एअरटेल मोठी बोली लावण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओ स्पेक्ट्रमच्या एकूण मूल्याच्या 37.36 टक्के, भारती 13.07 टक्के आणि व्होडाफोन आयडिया 3.73 टक्क्यांसाठी बोली लावू शकतात.  


हेही वाचा :


मोठी बातमी! मध्य प्रदेशच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही 'लाडकी बहीण योजना'? महिलांना महिन्याला मिळणार 1500 रुपये


मंगळवारी शेअर बाजारात काय होणार? कोणते शेअर्स पडणार, कोणत्या शेअर्समध्ये तेजी!


सरकारच्या 'या' तीन कंपन्यात गुंतवणूक करणारे झाले मालामाल, दोन वर्षात तब्बल 1200 टक्क्यांनी रिटर्न्स!