Kanda Express: सध्या कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी वाढ होताना दिसत आहे. सणासुदीच्या काळात कांद्याचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारनं प्लॅन केला आहे. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेडने खरेदी केलेला सुमारे 840 मेट्रिक टन कांदा बुधवारी दिल्लीत पोहोचला आहे. याआधीही भारतीय रेल्वेच्या विशेष कांदा एक्स्प्रेसने (Kanda Express) 1600 मेट्रिक टन कांदा दिल्ली-एनसीआरला पाठवला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये रेल्वेने कांदा पाठवण्याची ही दुसरी वेळ आहे.
35 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री केली जाणार
केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, बाजारपेठेतील एकूण उपलब्धता वाढवण्यासाठी, बहुतांश कांदा आझादपूर मंडईत विक्रीसाठी पाठवला जाईल. कांद्याचा काही भाग किरकोळ विक्रीसाठी 35 रुपये प्रतिकिलो या दराने ठेवला जाईल. विविध प्रदेशात कांदा वेळेवर, विश्वासार्ह आणि किफायतशीर पोहोचवण्यासाठी प्रथमच रेल्वेद्वारे कांद्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात येत आहे.
नाशिकहून चेन्नईला रेल्वेद्वारे पाठवला कांदा
नाफेडने यापूर्वी नाशिकहून 840 मेट्रिक टन कांदा रेल्वेद्वारे पाठवला होता, जो 26 ऑक्टोबर रोजी चेन्नईला पोहोचला होता. नाशिक ते गुवाहाटी असा आणखी एक रेल्वे रेक बुधवारी सकाळी 840 मेट्रिक टन कांद्यासह नाशिकहून निघाला. किंमत स्थिरीकरणासाठी सरकारने यावर्षी 4.7 लाख टन रब्बी कांदा खरेदी केला होता. 5 सप्टेंबरपासून देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये किरकोळ विक्रीद्वारे कांदा 35 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध झाला आहे. आतापर्यंत नाशिकसह अन्य स्रोत केंद्रातून 1.40 लाख टनांहून अधिक कांदा बफरमधील ग्राहक केंद्रांवर पाठवण्यात आला आहे.
किती राज्यात पोहोचली कांदा एक्सप्रेस ?
आतापर्यंत, NCCF ने 22 राज्यांमधील 104 ठिकाणी कांदा पोहोच केला आहे. तर NAFED ने 16 राज्यांमधील 52 ठिकाणी कांदा पोहोच केला आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, किरकोळ ग्राहकांना 35 रुपये प्रति किलो दराने कांदा उपलब्ध करून देण्यासाठी सफाल, केंद्रीय भंडार आणि रिलायन्स रिटेलसोबत भागीदारी करण्यात आली आहे. याशिवाय 86,500 मेट्रिक टन कांद्याचे किरकोळ वितरणासाठी 9 राज्य सरकारे आणि सहकारी संस्थांना वाटप करण्यात आले आहे.
या' राज्यांना मिलाला दिलासा
कांद्याचा बंदोबस्त सुरु झाल्यापासून आजपर्यंत, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्ली या प्रमुख राज्यांमध्ये कांद्याच्या किरकोळ किमती मोठ्या प्रमाणावर स्थिर झाल्या आहेत. सरकारी संस्थांचा असा विश्वास आहे की ऑक्टोबरमध्ये कांद्याच्या अखिल भारतीय सरासरी किरकोळ किमती मोठ्या प्रमाणात स्थिर होत्या. आता रेल्वे मार्गाने गुवाहाटीला पोहोचणाऱ्या कांद्याचा माल ईशान्येकडील राज्यांमध्ये कांद्याची उपलब्धता वाढवेल.
महत्वाच्या बातम्या: