Google parent to lay off 12000 workers : गूगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेट कंपनीने तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. रॉयटर्सनं याबाबतचं वृत्त दिलेय आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं कर्मचाऱ्यांना नोकरी गेल्याबाबतची माहिती दिली आहे. जगभरातील सहा टक्के नोकर कपात करण्याचा निर्णय गुगलनं घेतला आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीनं आपल्या दहा हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं. या बातमीमुळे टेक्नॉलजी क्षेत्रात खळबळ उडाली होती. ही बातमी ताजी असतानाच अल्फाबेट कंपनीनं 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.
नोकर कपातीचा परिणाम इतर सहकाऱ्यांवरही होतो. ज्यामध्ये भरती आणि काही कॉर्पोरेट कामं, तसेच काही अभियांत्रिकी आणि उत्पादनावरही याचा परिणाम होतो. सध्या जगभरात नोकरी कपात होत आहे. याचा सर्वाधिक परिणाम यूएसमधील कर्मचाऱ्यांवर होतो, असं गुगलने म्हटलेय.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना ईमेलवरुन सांगितलं की, "आम्ही येथे घेतलेल्या निर्णयांची संपूर्ण जबाबदारी घेतोय." कंपनीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी हा महत्वाचा क्षण आहे. एकूण खर्चाचं नियोजन आणि पुढील तयारासाठी हा निर्णय घेतला आहे, असे पिचाई यांनी सांगितलं. नोकरीवरुन काढलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा नोटीस कालावधी असेल अथवा 60 दिवसांचा पगार दिला जाईल, असेही पिचाई यांनी सांगितलं.
Googles Alphabet Layoffs 2023 : कोणत्या कंपनीत किती कपात?
ट्विटरएलन मस्क यांनी कंपनी ताब्यात घेतल्यापासून साधारण 50 टक्के कर्मचारी कपात केली आहे.
नेटफ्लिक्सनेटफ्लिक्सलाही यंदा आर्थिक फटका बसलाय, कंपनीनं दोन टप्प्यात कर्मचारी कमी केले.
मेटाफेसबुकची मूळ कंपनी मेटा कंपनी मोठी कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत
अॅमेझॉनई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन 18 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे.
सिगेट टेक्नॉलॉजिजहार्ड ड्राईव्ह निर्मितीतल्या महत्वाच्या कंपनीनंही 3000 कर्मचारी कपात करण्यात आली आहे.
इंटेल18 हजार कोटींची बचत करण्यासाठी जवळपास 20 टक्के कपातीची शक्यता आहे.
मायक्रोसॉफ्टअपेक्षित उत्पन्न नसल्याने मायक्रोसॉफ्टने 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.
कॉइनबेसअमेरिकेतील कॉइनबेस कंपनीने 18 टक्के कर्मचारी कमी केले
स्नॅपऑगस्टअखेर कंपनीने 20 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता
शॉपिफायऑनलाईन शॉपिंग कंपनी शॉपिफायनंही 10 टक्के कर्मचारी कपात केली
स्ट्राईपडिजिटल पेमेंट कंपनी स्ट्राईपनंही 14 टक्के कपातीची तयारी केलीय
ओपनडोअररिअल इस्टेटमधील स्टार्टअप कंपनी ओपनडोअरनंही 18 टक्के कर्मचाऱ्यांना काढलं
आणखी वाचा :मंदीचा फटका! गोल्डमन सॅच कंपनी 3,200 कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याच्या तयारीत
Layoffs in January : जानेवारीतही नोकरकपातीचा ट्रेण्ड, 15 दिवसांत गेला तब्बल 24 हजारांचा रोजगार