Google : जगातील आघाडीची टेक कंपनी Google Inc मध्ये पुन्हा एकदा नोकरकपातीचे (job cuts) संकट आले आहेत. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला 12,000 कर्मचाऱ्यांची नोकरकपात केली होती. कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी नोकरकपात होती. आता गुगल (Google) आपल्या जाहिरात विक्री युनिटमध्ये बदल करणार आहे. त्यानंतर पुन्हा छाटणीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. या विभागात सुमारे 30 हजार लोक काम करतात.


सुंदर पिचाई यांनी नोकरकपातीची पद्धत चुकीची असल्याचे म्हटलं होतं


गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी अलीकडेच सांगितले होते की, कंपनीने नोकरकपातीची प्रक्रिया (गुगल लेऑफ) योग्य प्रकारे पार पाडली नाही. या निर्णयाची अंमलबजावणी अधिक चांगल्या पद्धतीने करायला हवी होती. आम्ही पीडित कर्मचाऱ्यांना त्याच वेळी कळवायला नको होते. टाळेबंदीची अंमलबजावणीही आम्ही वेगळ्या पद्धतीने करु शकलो असतो असे पिचाई म्हणाले. नोकरबंदी हा कोणत्याही कंपनीसाठी खूप कठीण निर्णय असतो. 25 वर्षांत गुगलवर अशी वेळ कधीच आली नव्हती. मात्र, आम्ही तसे केले नसते तर भविष्यात परिस्थिती आणखी वाईट होऊ शकली असती असे पिचाई म्हणाले. कंपनी मोठ्या संकटात सापडली असती. जगात वेगाने होत असलेल्या बदलांना सामोरे जाताना आपल्याला आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. आम्ही नवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक करू शकत नाही.


google मध्ये काय होणार?


मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत गुगल अमेरिका आणि ग्लोबल पार्टनर्सचे अध्यक्ष सीन डाउनी  (Sean Downey) यांनी जाहिरात विक्री संघाची पुनर्रचना करण्याच्या योजनेबाबत माहिती सांगितली. बैठकीत त्यांनी नोकरकपातीचा उल्लेख केला नसला तरी कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे संकट वाढले आहे.


नोकरकपात का होऊ शकते?


गुगल आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये सतत गुंतवणूक करत आहे. याशिवाय जाहिरात खरेदीमध्ये कंपनी मशीन लर्निंगचा वापर करत आहे. AI वापरामुळं सर्वत्र लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळं कर्मचारी धास्तावले आहेत. कंपनीनं कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले नाही, तर त्यांची बदली अन्य कोणत्या तरी विभागात होऊ शकते. या मुद्द्यावर गुगलने अद्याप काहीही सांगितलेले नाही.


मंदीच्या भीतीनं कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं


गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने मंदीच्या भीतीने 12 हजार लोकांना कामावरून काढून टाकले होते. पिचाई म्हणाले होते की, आम्ही पीडित कर्मचाऱ्यांना माहिती देण्याचा योग्य प्रयत्न केला नाही. त्यामुळे त्यांच्या मनोबलावर वाईट परिणाम झाला. सुंदर पिचाई म्हणाले होते की, 25 वर्षांत गुगलवर अशी वेळ कधीच पाहिली नाही. Google ने ही प्रक्रिया चांगल्या प्रकारे हाताळली नाही. 


महत्त्वाच्या बातम्या:


गुगलमध्ये 12000 कर्मचाऱ्यांची नोकरकपात, वर्षभरानंतर प्रथमच बोलले सुंदर पिचाई...