Gold Rates : सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं ज्यांना सोन्याची खरेदी करायची आहे, त्यांनी लवकरात लवकर खरेदी करावी. जळगावमध्ये गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात 1100 रुपयांची घसरण झाली आहे. दोन दिवसापूर्वी सोन्याचा दर हा 76700 रुपये होता. तर आज सोन्याचा दर 75800 रुपये आहे. शुद्ध सोन्याचे 10 ग्रॅमसाठीचे हे दर आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचा चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळं सर्वसामान्य नागरिकांना सोनं घेणं परवड नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला मोठ्या संस्था, श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करताना दिसत आहेत. कारण, सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक नागरिकांना फायद्याची ठरत आहे. कारण दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढतच आहेत. यामुळं सोन्यात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरत आहे. दुसऱ्या बाजदुला सर्वसामान्य लोकांना सोन्याची खरेदी करणं शक्य नाही. त्यामुळं सोन्याच्या किंमती कधी कमी होणार असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आज सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं खरेदीदारांनी सोने खरेदी चांगली संधी आहे.
MCX वर आज सोन्याचा भाव किती?
आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दरात वाढ दिसून आली आहे. दरात 164 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीसह MCX वर सोने 75815 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. तर चांदीच्या किमतीवर नजर टाकली तर 113 रुपयांची वाढ दिसून येत असून ती 87300 रुपये प्रति किलो या भावाने विकली जात आहे. या वर्षी नोव्हेंबरपर्यंत पाहिल्यास, गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक 2.6 अब्ज डॉलरने वाढली आहे. मे 2024 पूर्वीही, सलग 12 महिने जागतिक स्तरावर गोल्ड ईटीएफमध्ये आउटफ्लो दिसून आला होता. चीनच्या मध्यवर्ती बँकेने खरेदी थांबवल्यानंतर, सोन्याला गुंतवणुकीचा सर्वाधिक आधार मिळाला. भविष्यात ईटीएफची मागणी मंद राहिल्यास सोन्यावर दबाव येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. संपूर्ण कॅलेंडर वर्षात आशियाई देशांमधील गुंतवणुकीची मागणी मजबूत राहिली आहे. तर तिसऱ्या तिमाहीत अमेरिकन डॉलर आणि रोखे उत्पन्न कमकुवत झाल्याने पाश्चात्य गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. मात्र, नोव्हेंबरमध्ये सोन्यामध्ये गुंतवणुकीच्या मजबूत मागणीचा कल थांबला.
महत्वाच्या बातम्या: