Gold Silver Rate नवी दिल्ली : सर्राफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात आज पुन्हा तेजी पाहायला मिळाली. सोन्याचे दर 391 रुपयांनी वाढून 98687 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर, चांदीच्या एक किलोच्या दरात 293 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचे दर 113600 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह सोन्याचे दर सर्राफा मार्केटमध्ये 24 कॅरेटच्या एका तोळ्याचे सोन्याचे दर 101647 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदी जीएसटीसह 117008 रुपयांवर पोहोचले आहेत. मंगळवारी चांदीचे दर जीएसटीशिवाय 113307 रुपये प्रति किलो होते. तर, सोन्याचे एका तोळ्याचे दर 98296 रुपयांवर आहेत.
या आठवड्यात सोन्याचे दर 100533 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. तिथून घसरुन 98687 रुपयांपर्यंत घसरले आहेत. या कालवाधीत सोन्याचे दर 1846 रुपयांवर आले आहेत. चांदीचे दर 2250 रुपये प्रति किलोनं कमी झाले आहेत. चांदीच्या दरानं 23 जुलै 2025 या दिवशी ऑल टाइम उच्चांक गाठला होता.
आज 23 कॅरेट सोन्याचे दर 390 रुपयांनी महागले आहेत. 23 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 98292 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह या सोन्याचा दर 101240 रुपयांवर गेले आहेत. यामध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.
22 कॅरेट सोन्याचे दर 358 रुपयांनी वाढून 90397 रुपये झाले आहेत. जीएसटीसह या सोन्याचा एका तोळ्याचा दर 93108 रुपये झाला आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा दर 293 रुपयांनी वाढून 74015 रुपये एक तोळा झाला आहे. जीएसटीसह हा दर 76235 रुपये झाला आहे. 14 कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह 59463 रुपये आहे.
जुलै महिन्यात सोन्याचे दर वाढले की घटले?
जुलैमध्ये चांदीच्या दरात सोन्याच्या तुलनेत मोठी वाढ झाली. या काळात सोन्याचे दर 2801 रुपये प्रति तोळानं वाढले आहेत. चांदीच्या दरात 7797 रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन च्या दरांनुसार 30 जूनला सोन्याचा दर 95886 रुपये होता. तर, चांदीचा दर 105510 रुपये एक किलो होता. हे दर जीएसटीशिवायचे आहेत.
सोने आणि चांदीचे हाजिर दर इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं जारी केले आहेत. सोन्याच्या आणि चांदीच्या दरात 1000 रुपये ते 2000 रुपयांचा फरक असू शकतो. आयबीजेएकडून दिवसातून दोन वेळा दर जाहीर केले जातात.
सर्राफा बाजारात सोन्याचे दर 22947 रुपयांनी वाढले आहेत. तर, चांदीचे दर 27583 रुपयांची वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2024 ला सोन्याचे दर 75740 रुपये एक तोळा होता. तर, चांदीचे दर 86017 रुपये एक किलो होते. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणामुळं गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करत आहेत.