Numerology: काही वेळेस लोक मेहनत, कष्ट करूनही त्यांना नशीब म्हणावं तसं साथ देत नाही. पण काही लोक असे असतात, जे जन्मापासूनच त्यांचं नशीब घेऊन येतोत. असं म्हणतात की, या लोकांचं नशीब विधाता सोन्याच्या पेनाने लिहितो. अंकशास्त्रानुसार, आज आपण अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, जे जन्मापासूनच खूप भाग्यवान असतात. त्यांचे नशीब नेहमीच त्यांच्यासोबत असते. त्यांनी कोणतेही काम हाती घेतले तर ते क्षणार्धात पूर्ण होते. त्यांना पैसा, प्रेम, नोकरी, आयुष्यात सर्वकाही नशिबाच्या आधारावर मिळते. एक प्रकारे, त्यांचे भाग्य देव जणू सोनेरी पेनाने लिहितो. अंकशास्त्रानुसार जाणून घेऊया ती कोणती जन्मतारीख किंवा मूलांक आहे?

Continues below advertisement

'या' जन्मतारखेच्या लोकांना नशीब कधीच फसवत नाही...

ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र यासारख्या गोष्टींबद्दल तुम्हाला सर्वांना चांगले माहिती आहे. ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून भविष्याचे संकेत देतात. विशेषतः ज्योतिषशास्त्र देखील एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व सांगते. पण तुम्हाला माहिती आहे का की अंकशास्त्र देखील तुमच्याबद्दल बरेच काही सांगते. अंकशास्त्राद्वारे तुम्ही कोणत्याही व्यक्तीबद्दल सर्व माहिती मिळवू शकता. अंकशास्त्रानुसार, आज आम्ही तुम्हाला अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल सांगणार आहोत, जे खूप भाग्यवान असतात. त्यांचे नशीब नेहमीच त्यांच्यासोबत असते. 

तुमचा मूलांक कसा ओळखाल?

अंकशास्त्रात मूळ संख्या म्हणजेच मूलांक खूप महत्वाची भूमिका बजावतो. तुमच्या जन्मतारखेच्या दोन्ही संख्या जोडून तो बनवला जातो. उदाहरणार्थ, जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 16 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 (1+6) असेल. अंकशास्त्रानुसार, मूलांक 1 आणि मूलांक 7 असलेले लोक खूप भाग्यवान असतात. मूलांक 1 मध्ये महिन्याच्या 1, 10, 28, 19 जन्मतारखा समाविष्ट असतात. मूलांक 7 मध्ये 7, 16, 25 जन्मतारखा समाविष्ट असतात. जर तुमचा जन्म या तारखांना झाला असेल तर ते खूप भाग्यवान असतात. अशा लोकांना नशिब कधीच फसवत नाही. त्यांचे आयुष्य अनेकदा मौजमजेत घालवतात. ते आयुष्यात खूप पैसे कमवतात. त्यांच्याकडे काम करण्याचे कौशल्य असते. ते खूप क्रिएटिव्ह असतात. समाजात त्यांचा विशेष दर्जा असतो. ते खूप नाव आणि पैसा कमवतात.

Continues below advertisement

कुटुंबाचे नशीब बदलतात...

अंकशास्त्रानुसार, मूलांक 1 आणि 7 असलेले लोक त्यांच्या कुटुंबासाठी देखील भाग्यवान असतात. त्यांच्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे नशीब बदलते. ते आत्मविश्वासाने भरलेले असतात. ते शिक्षण, राजकारण, मीडिया, व्यवसाय आणि खेळात चांगले करिअर करतात. त्यांचे नशीब इतके प्रबळ असते की ते ज्या घरात राहतात त्या घरातील सर्व लोकांचे नशीब चमकू लागते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच जादू असते. ते जिथे जातात तिथे वातावरण आल्हाददायक बनवतात. अशा लोकांनी गणेशजींची अधिक पूजा करावी. त्यांनी बुधवारी त्यांच्या नावाने उपवास करावा. यामुळे त्यांचे नशीब आणखी मजबूत होईल.

हेही वाचा :           

Monthly Horoscope August 2025: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन  राशींसाठी ऑगस्ट महिना कसा जाणार? पैसा, नोकरी, रिलेशन कसे असेल? मासिक राशीभविष्य वाचा..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)