Gold Silver Price Update Today: आज सोने आणि चांदी दरात चढ-उतार असल्याचे दिसून आले. मागील काही दिवसांपासून दरात चढ-उतार आहे. मागील आठवड्यात चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती. मात्र, आज चांदीच्या दरात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. 


सोने, चांदीचे दर काय?


मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर वधारला होता. सोन्याचा आजचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 48,199 रुपये इतका आहे. तर, चांदीच्या दरात 192 रुपयांची घसरण दिसून आली. चांदीचा दर एक किलो मागे 62,080 रुपये इतका होता. 


आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार आहे. सोन्याचा दर जवळपास एक टक्क्याने वधारला आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या दरात 0.97 टक्क्यांनी वाढ झाली. सोन्याचा दर 1809.09 डॉलर प्रति औंस दरावर व्यवहार करत आहे. तर, कॉमॅक्सवर चांदीच्या दरात 0.19 टक्के घट झाली असून 22.75 डॉलर प्रति औंस दरावर व्यवहार करत आहे. 


कोरोनाचा परिणाम :


जगभरात कोरोना संसर्ग जोर पकडत असून पुन्हा एकदा निर्बंध लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचा परिणाम   सोने-चांदीच्या दरावर होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक व इतर कारणांसाठी सोने खरेदीकडे लोकांचा कल वाढण्याची शक्यता आहे. Goodreturns या वेबसाईटनुसार सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७३१० रुपये प्रति 10 ग्रॅम इतका असून२४ कॅरेटचा दर ४८३१० रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. 


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha