दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. काल दिवसभरात राज्यात 31 ओमायक्रॉनबाधित आढळल्यानं चिंता वाढली, हिवाळी अधिवेशनातही कोरोनाची एन्ट्री, 32 जण कोरोना पॉझिटिव्ह
2. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सरकारला राज्यपालांच्या मंजुरीची प्रतीक्षा, भाजप उमेदवार देणार की निवडणूक बिनविरोध होणार याचाही सस्पेन्स कायम
3. संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार, प्रकरणात गुंतवत असल्याचा राणे-पिता पुत्रांचा आरोप, तर कारवाईसाठी शिवसेना आग्रही
4. अधिवेशनाचे दोन दिवस उरले; आज विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन वातावरण तापण्याची शक्यता
5. सध्या तरी शाळा बंद करण्याचा कोणताही विचार नाही; चाईल्ड टास्क फोर्सच्या सदस्यांची माहिती
6. मुंबईत कोरोनानं चिंता पुन्हा वाढवली, 13 दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ, तर ओमायक्रॉनबाधितांची संख्या 141 वर
7. उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यासह पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष, ओमायक्रॉनमुळं निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत असताना आज आरोग्य विभागासोबत बैठक
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 27 डिसेंबर 2021 : सोमवार : ABP Majha
8. बर्थ डे पार्टीत सलमान खाननं सांगितला सर्पदंशाचा किस्सा, दबंग खानला एक वेळा नव्हे तर तीन वेळा सापाचा दंश
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पनवेलच्या फार्म हाऊसवर सापाने दंश केला होता. सापाने दंश केल्यानंतर सलमान खान याच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. सलमान खानला एकदा नव्हे तर तीनदा सापाने दंश केला. या घडलेल्या घटनेबाबत सलमान खान याने घडलेल्या घटनेबाबत माध्यमांना सांगितले. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सलमान खानने माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. सलमान खानने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्याने म्हटले, फार्म हाऊसमधील खोलीत सापाने शिरकाव केला. त्यावेळी घरातील लहान मुले प्रचंड घाबरली होती. सापाला बाहेर काढण्यासाठी मी लाकडाची काठी मागितली, ती लहान होती. त्यानंतर लाकडाची मोठी काठी मला देण्यात आली. या काठीच्या आधारे मी सापाला काळजीपूर्वक उचलले आणि घराबाहेर आणले. काठीवर असलेला साप माझ्या हाताच्या दिशेने येत होता. सापाला घराबाहेर नेत असताना मी दुसऱ्या हातात काठी घेतली आणि त्याला घराबाहेर सोडले.
9. विशाल निकम ठरला मराठी बिग बॉस सीझन तीनचा विजेता, जय दुधाणेच्या गळ्यात उपविजेतेपदाची माळ
10. सेंच्युरियन कसोटीत भारताची दमदार सुरुवात, के. एल. राहुलच्या शतकाच्या जोरावर 3 बाद 272 धावांपर्यंत मजल