Gold Silver Rate : सोने आणि चांदी खरेदी (Gold Silver Rate) करणारांसाठी महत्वाची बातमी आहे. सलग दोन दिवस सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर आज सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज बाजारात सोन्याचे दर हे  58 हजार 852 रुपयांवर गेले आहेत. हे दर कालच्या तुलनेत आज वाढले आहेत. काल सोन्याचे दर  58 हजार 822 रुपयांवर होते. आज यामध्ये 0.05 टक्क्यांची म्हणजे 30 रुपयांची वाढ झाली आहे. 


सोन्याच्या दरानंतर आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात 402 रुपयांची म्हणजेच 0.55 टक्क्यांची वाढ दिसून आली. आज बाजारात चांदीचे दर 73 हजार 470 रुपये प्रति किलो आहे. काल वायदे बाजारात चांदीचे दर हे 73 हजार 68 रुपये प्रति किलोवर बंद झाले होते. सोन्याबरोबरच मागील दोन दिवस चांदीचे दरही कमी होत होते. मात्र, आज त्यामध्ये वाढ दिसून आली आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काय परिस्थिती आहे?


आज (शुक्रवार 22 सप्टेंबर) देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर तिथेही आज तेजी पाहायला मिळत आहे. मेटल रिपोर्टनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर हे 0.2 टक्क्यांनी वाढले आहेत. तर अमेरिकेतही सोन्याचा भाव हा 0.2 टक्क्यांनी वाढला आहे. सोन्याव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. चांदीच्या दरात 0.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. 


जाणून घेऊयात 10 प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे भाव


दिल्ली- 24 कॅरेट सोने 59,940 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 75,500 रुपये प्रति किलो
कोलकाता- 24 कॅरेट सोने 59,840 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 75,500 रुपये प्रति किलो
लखनौ- 24 कॅरेट सोने 59,940 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 75,500 रुपये प्रति किलो
पुणे- 24 कॅरेट सोने 59,840 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 75,500 रुपये प्रति किलो
मुंबई- 24 कॅरेट सोने 59,840 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 75,500 रुपये प्रति किलो
पाटणा- 24 कॅरेट सोने 59,890 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 75,500 रुपये प्रति किलो
चेन्नई- 24 कॅरेट सोने 60,110 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 79,000 रुपये प्रति किलो
हैदराबाद- 24 कॅरेट सोने 59,840 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 79,000 रुपये प्रति किलो
अहमदाबाद- 24 कॅरेट सोने 59,890 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 75,500 रुपये प्रति किलो
जयपूर- 24 कॅरेट सोने 59,940 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 75,500 रुपये प्रति किलो


महत्त्वाच्या बातम्या:


Gold : पोलिसांना टीप मिळाली... 80 बॉक्स भरून रेल्वेतून येतंय कोट्यवधी रुपयांचं सोनं; तपासानंतर प्रकरणाची गुंतागुंत अधिकच वाढली