Gold Silver Rate: सोने आणि चांदीची (Gold Silver Rate) खरेदी करणार्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅमसाठी सोन्याचे दर हे 59 हजार 238 रुपयांवर होते. गेल्या ट्रेडिंग दिवसाच्या तुलनेत सोन्याच्या दरात 44 रुपयांची घसरण झाली आहे. 18 सप्टेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 59 हजार 282 रुपये होता.
चांदीची चमकही झाली कमी
सोन्याव्यतिरिक्त, आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. फ्युचर्स मार्केटमध्ये चांदी सुरुवातीला 72 हजार 284 रुपये प्रति किलोवर गेली होती. यानंतर त्यात काही वाढ नोंदवण्यात आली असून सध्या दुपारी 12.30 वाजता 0.09 टक्के किंवा 64 रुपये प्रति किलोने घट होऊन 72,505 रुपये प्रति किलोवर गेली आहे. काल चांदीचे दर हे 72 हजार 569 रुपये प्रति किलो होते. आज यामध्ये घट झाल्याचे दिसून आले.
भारतातील टॉप 10 शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर काय आहेत?
चेन्नई- 24 कॅरेट सोने 60,550 रुपये, चांदी 78,000 रुपये किलो दराने विकली जात आहे.
मुंबई- 24 कॅरेट सोने 60,230 रुपये, चांदी 74,500 रुपये किलो
दिल्ली- 24 कॅरेट सोने 60,370 रुपये, चांदी 74,500 रुपये किलो
कोलकाता- 24 कॅरेट सोने 60,230 रुपये, चांदी 74,500 रुपये किलो
बेंगळुरू- 24 कॅरेट सोने 60,220 रुपये प्रति किलो, चांदी 73,250 रुपये किलो
हैदराबाद- 24 कॅरेट सोने 60,230 रुपये, चांदी 78,000 रुपये किलो
पुणे- 24 कॅरेट सोने 60,230 रुपये, चांदी 74,500 रुपये किलो
जयपूर- 24 कॅरेट सोने 60,370 रुपये, चांदी 74,500 रुपये किलो
लखनौ- 24 कॅरेट सोने 60,370 रुपये, चांदी 74,500 रुपये किलो
पाटणा- 24 कॅरेट सोने 60,270 रुपये, चांदी 74,500 रुपये किलो
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्यात घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.