Gold Silver Rate: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशीही सोन्याची चकाकी कायम आहे. फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव सध्या 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. रविवारपासून भारतात सणांचा हंगाम सुरु होईल. त्यामुळं सोने-चांदी खरेदीसाठी लोकांची गर्दी होणार आहे. अशा परिस्थितीत सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आज व्यवहार सुरु झाल्यावर सुरुवातीला सोन्याचा दर हा 57 हजार 970 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. यानंतर, त्याच्या किंमतीत आणखी वाढ नोंदवली गेली. सध्या सोन्याचे दर हे 58 हजार 70 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचले आहेत. ही सोन्याची वाढ कालच्या तुलनेत 152 रुपये किंवा 0.26 टक्क्यांनी वाढली आहे.


चांदीच्या दरातही वाढ


सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा भाव 69 हजार 526 रुपये प्रति किलोवर उघडला. यानंतर, त्याची किंमत वाढली आणि कालच्या तुलनेत 452 रुपये किंवा 0.65 टक्के वाढीसह ते 69 हजार 526 रुपये प्रति किलोच्या पातळीवर राहिले. काल चांदीचे दर हे 69 हजार 475 रुपयांच्या पातळीवर बंद झाले होते.


प्रमुख शहरातील सोन्या-चांदीचे दर


दिल्ली- 24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो
मुंबई- 24 कॅरेट सोने 58,910 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो
चेन्नई- 24 कॅरेट सोने 59,000 रुपये, चांदी 75,000 रुपये प्रति किलो
कोलकाता- 24 कॅरेट सोने 58,910 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो
जयपूर- 24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो
नोएडा- 24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो
गाझियाबाद- 24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो
लखनौ- 24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो
पाटणा- 24 कॅरेट सोने 58,960 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो
गुरुग्राम- 24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो
पुणे- 24 कॅरेट सोने 58,910 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो
अमृतसर- 24 कॅरेट सोने 59,060 रुपये, चांदी 72,600 रुपये प्रति किलो


आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीची चमक कायम


देशांतर्गत बाजाराप्रमाणेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा भाव 0.3 टक्क्यांनी वाढला आहे. तर अमेरिकेत सोन्याच्या किंमतीत 0.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोन्याव्यतिरिक्त चांदीच्या किमतीतही 0.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Gold Silver Rate:सणासुदीपूर्वी सोनं-चांदी महागलं, जाणून घ्या प्रमुख शहरांमधील आजचे दर