Gold Silver Rate: गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Rate) वाढ होत होती. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत होती. मात्र, सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जाणून घेऊयात सोन्या चांदीचे दराबबातची माहिती. 


नेमकी किती झाली सोन्या चांदीच्या दरात घसरण?


दरम्यान, सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा फायदा सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांना होणार आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज किंवा फ्युचर्स मार्केटमध्ये सोने 675 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज सराफा बाजारात सोन्याचा दर हा 73480 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​घसरला आहे. तर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात 1350 रुपयांची घसरन झाली आहे. चांदी सध्या 90418 रुपये प्रतिकिलो झाली आहे. गुरुवारी चांदीचा भाव हा 91772 रुपयांवर बंद झाला होता.


देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव किती?  (24 कॅरेट शुद्धता)


नवी दिल्ली -  सोने 490 रुपयांनी स्वस्त झाले असून ते सध्या 74500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबई - सोने 490 रुपयांनी स्वस्त झाले असून तो 74500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
कोलकाता -  सोने 490 रुपयांनी स्वस्त झाले असून ते 74350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नई - सोने 330 रुपयांनी स्वस्त होऊन आता 75000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
अहमदाबाद - सोने 490 रुपयांनी स्वस्त झाले असून सध्या 74400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
बंगळुरू - सोने 490 रुपयांनी स्वस्त झाले असून सध्या 74350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चंदीगड - सोने 490 रुपयांनी स्वस्त झाले असून 74500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
हैदराबाद - सोने 490 रुपयांनी स्वस्त झाले असून तो 74350 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
जयपूर - सोने 490 रुपयांनी स्वस्त झाले असून ते 74500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
लखनौ - सोने 490 रुपयांनी स्वस्त झाले असून ते 74500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात, COMEX वर सोने 1.22 टक्क्यांनी घसरले आहे. तर चांदीच्या दरात 1.57 टक्क्यांची घसरण झाली आहे. दरम्यान, सातत्यानं सोन्या चांदीच्या दरात वाढ होत होती. त्यामुळं सोनं खरेदीकडं लोकांनी पाठ फिरवली होती. आता मात्र, दरात घसरण झाल्यामुळं नागरिकांना सोनं चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Jagannath Puri : तब्बल 46 वर्षांनंतर देशातील सर्वात मोठ्या खजिन्याचं कुलूप उघडलं; जगन्नाथ पुरी मंदिराचं धन पाहून व्हाल थक्क