Gold Silver Rate News : पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावाचा सोन्या चांदीच्या भावावर (Gold Silver Rate) देखील परिणाम पाहायला मिळत आहे. मुंबईत सोन्याचा भाव हा 78 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडला आहे. एकाच दिवसात सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल सोन्याचा भाव हा 77 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. दरम्यान, दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 80 हजारापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
चांदीचा भाव 93 हजार 800 रुपये प्रति एक किलोवर
मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याबरोबरच चांदीच्या दराला देखील चांगलीच झळाळी येत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज चांदीचा भाव 93 हजार 800 रुपये प्रति एक किलोवर पोहोचला आहे. वाढत जाणाऱ्या दरामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचे भाव वाढण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. मध्यपूर्वेतील तणाव संपत नाही. त्यामुळं सोन्याच्या भावाला आधार मिळत असल्याचे दिसत आहे. भारतीय बाजारपेठेपासून ते परदेशी बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.
सोनं 80000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता
येत्या काही दिवसांत भारतात सणासुदीला सुरुवात होणार आहे. करवा चौथ, धनत्रयोदशी आणि दिवाळीला लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतात. यानंतर लग्नाच्या मोसमात सोन्याची मागणीही वाढते. त्यामुळं सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे सोन्याच्या मागणीवर कोणताही परिणाम होणार नाही. नेहमीप्रमाणे या सणासुदीतही भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतील. या सणासुदीच्या हंगामात सोन्याच्या मागणीत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, अशी त्यांना आशा आहे. त्यामुळं सोनं 80000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
नेमके का वाढले सोन्याचे दर?
फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या निर्णयाचा परिणाम सोन्याच्या किमतीवर लगेच दिसून येत आहे. तेव्हापासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे, पण याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. व्याजदर कपातीच्या निर्णयानंतर सोन्याचा भाव नवा उच्चांक गाठू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर भविष्यात तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. त्यामुळं अनेक संस्था, श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. कारण सोन्यात केलेली गुंतवणूक मोठा परतावा देते, त्यामुळं अनेकांचा सोन्या चांदीत गुंतवणूक करण्याचा कल असतो.
महत्वाच्या बातम्या: