Gold Silver Rate News : सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) सातत्यानं चढ उतार होत आहे. गेल्या काही दिवसापासून दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, आज सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज झारखंडची राजधानी रांचीच्या सराफा बाजारात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 67,250 रुपये आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 70,610 रुपये नोंदवला गेला. त्या वेळी, चांदी 88,000 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.


नेमकी किती झाली घसरण?


मिळालेल्या माहितीनुसार, आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण दिसून आली आहे. काल संध्याकाळी 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 67,350 रुपयांना विकले गेले. आजही त्याची किंमत 67,250 रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच किमतीत 100 रुपयांची घट झाली आहे. त्याच वेळी, बुधवारी लोकांनी 70,720 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने 24 कॅरेट सोने खरेदी केले. आज त्याची किंमत 70,610 रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच किंमतीत 110 रुपयांची घसरण दिसून आली आहे.


अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण 


देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा दर वाढू लागले होते. आता पुन्हा दरात किंचीत घसरण झाली आहे. अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सोन्यावरील कस्टम ड्युटी लक्षणीयरीत्या कमी केल्याचे सांगितले. त्याचा परिणाम सोन्याच्या घसरणाऱ्या किमतीवर स्पष्टपणे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने बनवण्याचा विचार करत असाल तर खरेदी करुन शकता. आज झारखंडची राजधानी रांचीच्या सराफा बाजारात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 67,250 रुपये आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 70,610 रुपये नोंदवला गेला. त्याच वेळी, चांदी 88,000 रुपये प्रति किलो दराने विकली जाईल.


चांदीच्या दरात आज 500 रुपयांची घसरण 


सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली आहे. चांदीच्या दरात आज 500 रुपयांची घसरण दिसून आली आहे. आज चांदी 88 हजार रुपये प्रति किलो दराने विकली जातेय. तर काल (बुधवार) सायंकाळपर्यंत चांदी 88,500 रुपये दराने विकली गेली.


सोने खरेदी करताना काळजी घ्यावी


दरम्यान, सोन्याची खरेदी करताना तम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. सोने घेतना कधीही गुणवत्तेकडे दुर्लक्ष करू नका. हॉलमार्क पाहूनच दागिने खरेदी करा, ही सोन्याची सरकारी हमी आहे. भारताची एकमेव एजन्सी, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS), हॉलमार्क ठरवते. सर्व कॅरेटचे हॉल मार्क नंबर वेगवेगळे असतात, ते पाहिल्यानंतर आणि समजून घेतल्यानंतर तुम्ही कोणते सोने खरेदी करावे.


महत्वाच्या बातम्या:


Gold Silver Rate : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर?