Gold Silver Price: तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायची (Gold Silver Price Today) असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे (Gold) दर घसरले आहेत, चांदीचेही (Silver) भाव खाली आले आहेत. देशाच्या कमोडिटी मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किमती घसरल्यामुळे सर्वसामान्य खरेदीदारांसाठी चांगली संधी निर्माण झाली आहे.
सोन्या-चांदीचे आजचे दर
मंगळवारी देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूंच्या दरात घसरण झाली. MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याच्या दरात 350 रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात आज प्रति 10 ग्रॅम 377 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव 0.63 टक्क्यांच्या घसरणीसह 59,705 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. या सोन्याच्या किमती त्याच्या ऑक्टोबर वायद्यासाठी आहेत. सोने आज 59,705 रुपयांची नीचांकी पातळी गाठून 59,930 रुपयांवर पोहोचले होते.
MCX वर चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून ती 600 रुपयांपर्यंत गेली आहे. आज चांदीच्या भावात 0.80 टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. चांदीचे दर 600 रुपयांनी घसरून 74,827 रुपये प्रति किलो झाले आहेत. चांदीच्या या किंमती त्याच्या सप्टेंबरच्या वायद्यासाठी आहेत. चांदी आज 74,750 रुपयांची नीचांकी पातळी गाठून 75,330 रुपयांवर पोहोचली आहे.
ऑगस्टमधील दरांकडे लक्ष
मे आणि जून महिन्यात सोने-चांदीचा भाव लक्षणीयरीत्या कमी झाला होता, ज्यामुळे सर्वसामान्यांना खरेदीवर मोठी दिलासा मिळाला. परंतु दोन महिन्यात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीची कसर जुलै महिन्यात भरून निघाली. सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव पुन्हा एकदा 60 हजार रुपयांवर पोहोचला. अशातच आता ऑगस्ट महिन्यात सोने-चांदीच्या किंमतीत दिलासा कायम राहणार की नवीन विक्रम नोंदवले जाणार? याकडे सर्वसामान्यांचं लक्ष असणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याचा भाव प्रचंड घसरलाआहे आणि प्रति औंस $15 पेक्षा जास्त घसरणीसह कायम आहे. कोमेक्सवर सोने डिसेंबर फ्युचर्स $1,993.25 प्रति औंसवर आहेत आणि $15.95 प्रति औंसने खाली आले आहेत. टक्केवारीच्या दृष्टीने ही घट 0.79 टक्के आहे.
जागतिक बाजारातही चांदीचे दर घसरले
जागतिक बाजारातही चांदीच्या किमतीत घसरण दिसून येत असून चांदीचे दर 1 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. कोमेक्सवर 1.10 टक्क्यांच्या घसरणीसह चांदी 24.698 डॉलर प्रति औंस दराने विकली जात आहे. सोन्याची खरेदी करताना तिच्या शुद्धतेचा तपास करुन घेणं गरजेचं असतं, यासाठी हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करावे.
हेही वाचा: