मुंबई : गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या सोन्याच्या भावात आज तेजी आली असून त्यामध्ये 800 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 47,800 रुपये असून 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 46,800 रुपये इतका आहे. चांदीच्या भावातही 1500 रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीसाठी 72,700 रुपये मोजावे लागणार आहेत.
गेल्या दहा दिवसांचा विचार करता सोन्याचे भाव स्थिर असल्याचं दिसून येत होतं. 20 मे रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,000 रुपये होता, तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 47,000 हजार रुपये होता. त्यानंतर 21 मेपासून 26 मेपर्यंत सोन्याचे भाव स्थिर असल्याचं पाहायला मिळत होतं. आज अचानक त्यामध्ये तेजी आल्याचं पहायला मिळतंय.
बुधवारी चांदीचा दर हा 71,200 रुपये इतका होता. पण त्यामध्ये आज तब्बल 1500 रुपयांची वाढ झाली असून ती किंमत 72,700 रुपयांवर पोहोचली आहे. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसात या दरात चढ-उतार दिसत आहे. 16 मे रोजी चांदीचा दर प्रतिकिलो 71,000 हजार रुपये इतका होता. तर 18 मे रोजी तो प्रतिकिलो 74,000 हजारांवर पोहोचला. पुन्हा 19 मेपासून चांदीच्या दरात घट झाल्याचं पाहायला मिळालं. 19 मे रोजी प्रतिकिलो 73,000 रुपये, 20 मे रोजी प्रतिकिलो 72,300 रुपये, 21 मे रोजी प्रतिकिलो 71,200 रुपये, 22 मे प्रतिकिलो 71,100 रुपयांपर्यंत चांदीच्या दरात घट झाली. त्यानंतर 23 मे रोजी चांदीच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली, तर 24 मे रोजी चांदीच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली होती. तर 25 आणि 26 मे रोजी चांदीच्या दरात 300 रुपयांची घट झाली होती.
मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
महत्वाच्या बातम्या :