मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्यातील गुंतवणुकीत झालेली घट आणि डॉलरच्या किंमतीचे बळकटीकरण यामुळे सोन्याच्या किंमतीतील घट सुरुच आहे. मंगळवारी बाजार बंद होताना सोन्याच्या किंमतीमध्ये 300 रुपयांची घट झाली. मुंबई आणि पुण्यात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,900 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 45,900 रुपये इतका आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याचा भाव हा सर्वाधिक कमी आहे. चांदीच्या भावातही 700 रुपयांची घसरण झाली असून एक किलो चांदीसाठी आता 67,300  इतकी रक्कम मोजावी लागणार आहे.  


आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झाल्याने होलसेल आणि रिटेलमध्ये सोन्याची मागणी कमी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होताना दिसत आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात सर्वाधिक कमी किंमत आल्याचं पहायला मिळतंय. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,200 रुपये इतका होता. आज त्यामध्ये 300 रुपयांची घट झाली असून तो भाव 46,900 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्याापासून सोन्याच्या भावात किरकोळ घट दिसून येत आहे. 


चांदीच्या भावाचा विचार केल्यास त्यामध्ये चढ-उतार होत असल्याचं दिसून येतंय. मंगळवारी एक किलो चांदीचा दर हा 68,000 रुपये इतका होता. आज त्यामध्ये 700 रुपयांची घसरण झाली असून तो 67,300 रुपयांवर पोहोचला आहे. त्या आधी दोन दिवस चांदीच्या भावात कोणताही बदल झाला नव्हता. 


मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो. 


ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास अकरा हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. 


महत्वाच्या बातम्या :