Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या (Gold-Silver) दरात अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज सोन्या-चांदीच्या किंमतीत थोडा बदल झाला असून बुधवारी सोने चांदीचे दरात घसरण दिसून आली होती तर आज मात्र सोन्याच्या दरात तेजी तर चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जाणून घ्या आजचे ताजे दर



आज सोने आणि चांदीचे दर (Gold Silver Price Today)
आज सोने 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम - 46,700 रुपये 
24 कॅरेट साठी 50,950 रुपये 
तर 10 ग्रॅम चांदीचा दर 581 रुपये



शहर सोने      (22k)        1 किलो चांदीचा दर 
मुंबई          46,700        58100
पुणे            46,730        58100
नाशिक       46,730        58100
नागपूर        46,730        58100
दिल्ली         46,850        58100
कोलकाता   46,700         58100


सोने-चांदीचा कालचा भाव (2 November 2022)


शहर   सोने 1 किलो     चांदीचा दर 
मुंबई      46,457        59,030
पुणे        46,457        59,030
नाशिक   46,457        59,030
नागपूर    46,448        58,980
दिल्ली     46,374        58,870
कोलकाता 46,393      58,900


 


भारतातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर
Goodreturns वेबसाइटवर जाहीर झालेल्या किमतींनुसार, देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या किमती पुढीलप्रमाणे आहेत- मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि केरळमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दिल्ली, जयपूर, लखनौ आणि चंदीगडमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,010 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चेन्नई, कोईम्बतूर आणि मदुराईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.


चांदीचे दर
मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे, अहमदाबाद, जयपूर, लखनौ आणि चंदीगडमध्ये चांदीचा दर 58,100 रुपये प्रति किलो आहे. चेन्नई, कोईम्बतूर, मदुराई, विजयवाडा येथे चांदीचा दर 64,000 रुपये प्रति किलो आहे.



सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्याल?


सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नसते आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.


जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने चमकदार असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाही. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.


हॉलमार्क लक्षात ठेवा
सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहूनच ग्राहक खरेदी करतात. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.


मिस्ड कॉलद्वारे किंमत जाणून घ्या
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर काही वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.