Gold Price News: सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. दरम्यान, अमेरिकन जॉब मार्केट डेटा आला आहे. कमकुवत आकडेवारीनंतर अर्थव्यवस्थेत पुन्हा मंदी येण्याची चिन्हे आहेत. आता फेडरल रिझर्व्ह या महिन्यात व्याजदरात मोठी कपात करण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळं पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या दरात 1200 रुपयांची आणि सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली.
24 कॅरेट सोन्याची किंमत किती?
दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढून 74200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. तर, जर आपण चांदीबद्दल बोललो तर चांदी 1200 रुपयांनी महाग झाली आहे. 85800 रुपयांवर चांदी गेली आहे. IBJA म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत 7193 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर 22 कॅरेटची किंमत 7020 रुपये प्रति ग्रॅम, 20 कॅरेटची किंमत 6402 रुपये प्रति ग्रॅम, 18 कॅरेटची किंमत 5826 रुपये प्रति ग्रॅम आणि 14 कॅरेटची किंमत 4640 रुपये प्रति ग्रॅम आहे. यामध्ये 3 टक्के GST आणि मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ
दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या आठवड्यात स्पॉट गोल्ड प्रति औंस 2497 डॉलर आणि चांदी 28 डॉलर प्रति औंसवर बंद झाली. या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड प्रति औंस 2484 डॉलरवर बंद झाले.
ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ
ऑगस्ट महिन्यात मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली. ऑगस्टमध्ये सोन्याच्या दरात सुमारे 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात एक टक्क्याहून कमी घसरण दिसून आली आहे. परदेशातील बाजारात देखील सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. जिथे ऑगस्ट महिन्यात डॉलर इंडेक्सने एका वर्षातील नीचांकी पातळी गाठली. दुसरीकडे मध्यपूर्वेतील तणावाच्या स्थितीमुळं देखील सोन्याच्या दरात वाढ झालीय. दरम्यान, अमेरिकेची महागाई आणि अर्थव्यवस्थेची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपातीचा निर्णय घेते की नाही हे कळेल. तसेच, फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांनी आधीच पुष्टी केली आहे की सप्टेंबरमध्ये होणारी बैठक कमी केली जाऊ शकते. जर 0.25 किंवा त्याहून अधिकची घट दिसली तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण दिसू शकते. दरम्यान चालू सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या: