Gold-Silver Price : आज सोने-चांदी (Gold-Silver Price) खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसात सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होताना दिसत आहे, गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचा भाव (Gold Rate) स्थिर होता, मात्र आज सोन्याचा दर स्वस्त झाला आहे, तर चांदीच्या दरातही (Silver Rate) घसरण झाली आहे


आज सोन्याचा भाव किती?


आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,600 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,930 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 595 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये या मौल्यवान धातूची किंमत 47,850 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. 


मुंबई - 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,600 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
           24 कॅरेट सोन्याची किंमत 51,930 रुपये (प्रति 10 ग्रॅम) 


पुणे - 22 कॅरेट सोन्याचा दर 47,630 (प्रति 10 ग्रॅम) 
         24 कॅरेट सोन्याचा दर 51,960 रुपये (प्रति 10 ग्रॅम) 


नागपूर - 22 कॅरेट सोन्याचा दर 47,630 (प्रति 10 ग्रॅम)
              24 कॅरेट सोन्याचा दर 51,960 रुपये (प्रति 10 ग्रॅम)


नाशिक - 24 कॅरेट सोन्याचा दर 47,630 (प्रति 10 ग्रॅम)
               22 कॅरेट सोन्याचा दर 51,960 रुपये (प्रति 10 ग्रॅम) 


चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 595 रुपये आहे.


सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.


'या' गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
सोन्याच्या दागिन्यांमध्ये, ज्वेलर्स स्वतंत्रपणे मेकिंग चार्जेस आकारतात. खरेदी करताना ही माहिती आवर्जून घ्या.
खरेदी करताना रिटर्न पॉलिसीबद्दल माहिती घ्या.
सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग कायद्याने बंधनकारक आहे. 
खरेदी करताना हॉलमार्किंगची खात्री करा. हॉलमार्किंग गुणवत्ता आणि शुद्धतेची हमी देते.


तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) : 


ग्राहक आता घरी बसूनसुद्धा आजचे सोन्याचे दर तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सोन्याची किंमत तपासू शकता. मात्र, लक्षात ठेवा तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.