Digital Gold: डिजीटल सोनं खरेदी करणं ठरू शकते फायदेशीर? जाणून घ्या
सोनं डिजीटल पद्धतीने खरेदी केले जाऊ शकते का? तर, याचे उत्तर होय असे आहे. डिजीटल सोनं खरेदी करण्याचा पर्याय आहे. डिजीटल सोनं खरेदी करून ग्राहक आपल्या वॉलेट स्टोअरमध्ये ठेवू शकतो. हे सोने खरेदी केल्यानंतर तुम्ही नंतर त्याची विक्री करू शकता. डिजीटल सोनं खरेदी करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखरेदी केलेल्या डिजीटल सोन्याचे रुपांतर तुम्ही वास्तविक सोन्यातही करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. सोन्यातील ही गुंतवणूक तुम्हाला सोन्याची बिस्किटे अथवा नाण्यात बदलून मिळते.
डिजीटल सोने खरेदी-विक्री कऱण्यासाठी तुम्ही ई-वॉलेट सारख्या कंपन्या गुगल पे, फोन पे, पेटीएम सारख्या डिजीटल पेमेंट अॅपचा वापर करू शकता.
डिजीटल पेमेंट अॅपचा वापर करून तुम्ही एमएमटीसी लिमिटेड, ऑग्मेंट गोल्ड लिमिटेड आणि स्विस फर्म एमकेएस पीएएमपी सारख्या कंपन्याचे डिजीटल सोने खरेदी करू शकता.
डिजीटल सोन्याचे रुपांतर करून नाणे तयार करण्यासाठी, आपल्याला त्याचे डिझाइन शुल्क भरावे लागेल. पण, डिजिटल सोने खरेदीवर तुम्हाला ३ टक्के जास्त जीएसटी भरावा लागेल. काही डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्मवरून सोने खरेदी करत असल्यास तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.
ई-वॉलेट कंपन्या MMTC Ltd सारख्या डिजिटल सोने विकणाऱ्या कंपन्यांसाठी एक प्लॅटफॉर्म तयार करतात.