Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात (Gold Price Today) गेल्या काही दिवस पासून सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत असून आठवडा भरात तब्बल दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह 65400 रुपये (Gold Price with GST) इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. देशात लग्नाचा हंगाम सुरु झाला त्यामुळे सोन्या-चांदीची (Gold Silver Price) मागणीत वाढ झाली आहे. अशात सोने-चांदीचे दर दिवसागणित वाढताना दिसत आहेत.


एका आठवड्यात सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची वाढ


सोन्याच्या वाढत्या दराबाबत सोने व्यावसायिकांच्या मते जागतिक पातळीवर अमेरिकन बँकाच्या वतीने व्याज दर वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, त्यात करण्यात न आल्याने गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्याकडे वळवल्याने सोन्याच्या मागणीत वाढ होऊन सोन्याच्या दरात वाढ होत आहे. आज सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याचे दर 63500 (Gold Silver Price in Jalgaon) तर जीएसटीसह हाच दर 65400 (Gold Silver Price in Jalgaon with GST) इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले असल्याचं पाहायला मिळत आहे. 


भाव वाढला तरी मागणी कायम


वाढत्या सोन्याच्या दरामुळे (Gold Rate Hike) ग्राहक वेट अँड वाचच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. ग्राहकांच्या मते सोन्याचे दर वाढल्याने बजेट नक्कीच बिघडलं आहे. मात्र, आगामी काळात सोन्याचे दर अजून वाढण्याची शक्यता असल्याने आणि घरात लग्न समारंभ असल्याने सोने खरेदी गरजेची असल्याने कमी प्रमाणत का होई ना खरेदी करावे लागत असल्याचं ग्राहकांनी सांगितलं आहे.


देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट)



  • मुंबई - मुंबईत सोन्याचा भाव 63760 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Mumbai Gold Rate Today)

  • दिल्ली - सोन्याचा भाव 63910 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. (Delhi Gold Rate Today)

  • कोलकाता - सोन्याचा दर 63760 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)

  • चेन्नई - सोन्याचा दर 64530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)


महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)



  • जळगाव - 63500 रुपये प्रति 10 ग्रॅम (Jalgaon Gold Price Today)

  • पुणे - 63760 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Price Today)

  • नाशिक - 63790 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nashik Gold Price Today)

  • नागपूर - 63760  रुपये प्रति 10 ग्रॅम (Nagpur Gold Price Today)

  • कोल्हापूर - 62560  रुपये प्रति 10 ग्रॅम (Kolhapur Gold Price Today)