Gold Silver Rate Today, 17 January 2024 : भारतीय सराफा बाजारात आज सोने-चांदी स्वस्त झाल्याने (Gold Silver Price Today) ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सोन्याचा दर 110 रुपयांनी कमी झाला आहे. सोने-चांदी खरेदी आधी आज सोने-चांदीचा दर काय आहे, हे जाणून घ्या. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 17 जानेवारी 2024 रोजी बुधवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Silver Price) प्रतितोळा 5805 रुपये आहे, तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 6333 रुपये आहे.
सोनं झालं स्वस्त
आज सोन्याच्या दरात किंचित घट झाली आहे. आज सोनं 110 रुपयांनी स्वस्त झालं आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 18 कॅरेट सोन्याचा दर 47,490 रुपये प्रतितोळा आहे. तर, 22 कॅरेट सोन्याची किंमत 58,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 63,330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, मंगळवारी सकाळी प्रतितोळा 24 कॅरेट सोन्याचा दर 63,440 रुपये होता, आज बुधवारी हा दर 63,330 रुपये आहे.
चांदीच्या दरातही घसरण
आज सोन्यासह चांदीचा भावही घसरला आहे. बुधवारी चांदी 300 रुपये किलोने स्वस्त झाली आहे. आज मुंबईमध्ये चांदीचा दर 76,300 रुपये प्रति किलो आहे. मंगळवारी एक किलो चांदीचा भाव 76,800 रुपये होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव 2,049 डॉलर प्रति औंस झाला, तर चांदीचा भावही घसरून 23.06 डॉलर प्रति औंस झाला. डॉलर आणि यूएस बाँडच्या उत्पन्नात सुधारणा झाल्याने मंगळवारी सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट सोन्याचा दर)
- दिल्ली - दिल्लीत आज 24 कॅरेट सोनं 63,480 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 58,200 रुपये प्रतितोळा आहे. (Delhi Gold Rate Today)
- चेन्नई - चेन्नईत आज 22 कॅरेट सोन्याचा दर 58,500 रुपये तर, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63,820 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)
- मुंबई - मुंबईत आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63330 रुपये प्रति 10 ग्रॅमवर तर 22 कॅरेट सोन्याचा दर 58,050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. (Mumbai Gold Rate Today)
- कोलकाता - कोलकात्यात सोन्याचा आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव 58,050 रुपये प्रतितोळा आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,050 रुपये प्रतितोळा आहे. (Kolkata Gold Rate Today)
महाराष्ट्रातील विविध राज्यातील 24 कॅरेट सोन्याचा भाव (Maharashtra Gold Rate)
- पुणे - सोन्याचा आजचा दर 63330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Pune Gold Rate)
- नाशिक - 24 कॅरेट सोने 63370 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nashik Gold Rate)
- नागपूर - 24 कॅरेट सोने 63330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nagpur Gold Rate)
- कोल्हापूर - 24 कॅरेट सोने 63330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolhapur Gold Rate)