Gold Rate Today : साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून दसरा (Dussehra 2022) या सणाचं महत्व आहे. या निमित्ताने आज सगळीकडे नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. सोन्या-चांदीच्या खरेदीत गुंतवणूक म्हणून अनेक ग्राहक नाणी (कॉईन्स) प्राधान्य देतात. मात्र आजच्या दिवशी जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर ग्राहकांना थोडे जास्त पैसे मोजावे लागतील. कारण कालच्या तुलनेत आज सोन्या-चांदीचे दर (Gold-Silver Rate) वधारले आहेत. आंतररारष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किंमती सातत्याने वाढतायत. याचाच परिणाम भारतीय बाजारपेठेवरही दिसून येतोय. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.60 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,800 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 61,790 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
शहर | सोने | 1 किलो चांदीचा दर |
मुंबई | 47,483 | 61,790 |
पुणे | 47,483 | 61,790 |
नाशिक | 47,483 | 61,790 |
नागपूर | 47,483 | 61,790 |
दिल्ली | 47,401 | 61,680 |
कोलकाता | 47,419 | 61,710 |
जागतिक बाजारपेठेतील सोन्या-चांदीचे दर :
स्पॉट गोल्ड 0110 GMT नुसार 0.2 टक्क्यांनी वाढून $1,663.79 प्रति औंस झाला. किमती सात मधील त्यांच्या सर्वात मोठ्या साप्ताहिक नफ्याकडे जात असताना, आतापर्यंतच्या महिन्यासाठी ते 2.8 टक्क्यांनी खाली आले आहे. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.3 टक्क्यांनी वाढून $1,673.10 वर पोहोचले. स्पॉट सिल्व्हर 0.2 टक्क्यांनी वाढून $18.86 प्रति औंस, प्लॅटिनम $865.46 वर स्थिर होते आणि पॅलेडियम 0.5 टक्क्यांनी वाढून $2,211.59 वर होते.
तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) :
ग्राहक आता घरी बसूनसुद्धा आजचे सोन्याचे दर तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सोन्याची किंमत तपासू शकता. मात्र, लक्षात ठेवा तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
महत्वाच्या बातम्या :