Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून अस्थिरता पाहायला मिळतेय. कधी सोनं महाग तर कधी स्वस्त अशी परिस्थिती निर्माण होतेय. या सोन्याच्या अस्थिर दरामुळे ग्राहकांमध्येदेखील सोनं खरेदी करण्याबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, आता जर सोन्याचे दर पाहिले तर सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट सुरुच आहे. त्यामुळे यंदाच्या गुढीपाडव्याला सोनं खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. जाणून घ्या आजचे ताजे दर काय आहेत. 

काय आहे आजचा दर ?

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.34 टक्क्यांनी घसरून आज 24 कॅरेट सोन्याचेे दर 51,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 47,640 वर व्यवहार करत आहेत. चांदीचा दर 0.82 टक्क्यांनी घसरून 556 रुपयांनी घसरून 66,850 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. 

आज 31 मार्च जाणून घ्या सोन्या चांदीचे ताजे दर : 

शहरदर 
मुंबई 47, 640
पुणे47,690
नागपूर47, 690
नाशिक47,680
दिल्ली48, 585
कोलकाता48,495
चेन्नई48,500

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या :