Share Market Updates : आर्थिक वर्ष 2021-22 च्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजी दिसून आली. आशियाई शेअर बाजारात किंचीत घसरण दिसून आली. शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये 95 अंकांनी वधारत 58779 अंकावर तर, निफ्टी 20 अंकांनी वधारत 17519 अंकावर सुरू झाला.
निफ्टी 50 मधील 43 शेअरमध्ये तेजी तर, सात शेअरमध्ये घसरण दिसून आली. तर, 30 स्टॉकचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्समधील 30 शेअरमधील 24 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 6 शेअरमध्ये घसरण दिसून आली. बँक निफ्टी 57 अंकांनी वधारला. आज सकाळी 10.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 70 अंकांनी वधारत 58,756.63 अंकांवर ट्रेड करत होता. तर, निफ्टी 17.85 अंकांनी वधारत 17,515 अंकांवर ट्रेड करत होता.
विविध क्षेत्रातील निर्देशांकाचा कल कसा ?
आज शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रातील निर्देशांकाचा कल सकारात्मक दिसून येत आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. रिअल इस्टेट, मीडिया, ऑटो, बँक, एफएमसीजी, आयटी, फार्मा आणि वित्तीय सेवांमधील शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.
एशियन पेंट्समध्ये 1.37 टक्के, महिंद्र अॅण्ड महिंद्रा 1.25 टक्के, आयटीसी 0.86 टक्के आणि एचडीएफसी 0.80 टक्क्यांनी वधारले आहेत.
इन्फोसिसचा शेअर 0.53 टक्क्यांनी व्यवहार करत आहे. बजाज फिनसर्व्ह 0.51 टक्के, रिलायन्समध्ये 0.45 टक्के, पॉवर ग्रीडमध्ये 0.44 टक्के आणि मारूतीमध्ये 0.20 टक्क्यांची घसरण दिसून आले.
बुधवारी शेअर बाजार वधारला
बुधवारी, शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 740 अंकांनी तर निफ्टी 173 अंकानी वधारला. सेन्सेक्समध्ये 1.28 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,683 वर पोहोचला तर निफ्टीमध्ये 1 टक्क्यांची वाढ होऊन तो 17498 वर पोहोचला.
बुधवारी शेअर बाजारातील 2001 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1213 शेअर्समध्ये घसरण झाली. 93 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- शेतीसाठी उपकरणे खरेदी करताय? सरकारी अनुदानाचा मिळेल लाभ, जाणून घ्या सर्व माहिती
- PAN Aadhaar Link : 'या' व्यक्तींना पॅन-आधार लिंक करणे बंधनकारक नाही, जाणून घ्या काय आहे कारण?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha