Gold Rate Today 29 November 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ उतारांचा परिणाम प्रामुख्याने सोने-चांदीच्या किंमतींवर दिसून येतो. भारतीय सराफा बाजारात (Sarafa Bazar) मागील आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold-Silver Rate) चांगलीच वाढ झाल्याचे दिसले. त्यामुळे गुंतवणूकदारांची (Investors) चांदी झाली. मात्र त्यानंतर सोन्यातील तेजीचा आलेख स्थिरावल्याचे दिसून आले. तर, आज मंगळवारच्या दिवशी सराफा बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. चांदीच्या किंमतींमध्ये किंचीत घट दिसत आहे.
Gold Rate Today : कालच्या किंमतीच्या तुलनेत आज किती भाव?
इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशननुसार, आज सोन्याचा भाव पाहता, काल 28 नोव्हेंबरचे सोने-चांदीचे दर पाहता किंमतींत जास्त फरक दिसत नव्हता. त्यामुळे त्यात कोणताही बदल झालेला नाही.
Gold Rate Today : आजचा सोन्याचा भाव काय?
24 कॅरेटसाठी 53140 रुपये प्रति तोळा
22 कॅरेटसाठी 48,710 रुपये प्रति तोळा
Gold Rate Today : आजचा चांदीचा भाव, 400 रुपयांची आज घट
चांदीच्या किंमतींबाबत बोलायचे झाल्यास, आज दरात किंचित घट झाली आहे. चांदीच्या किंमती आज 61,400 रुपये प्रति किलो आहेत. काल 28 नोव्हेंबरला याची किंमत 61,400 रुपये प्रति किलो होती. कालच्या तुलनेत आज चांदीच्या किंमतींमध्ये 400 रुपयांची घट झाली आहे.
Gold Rate Today : जाणून घ्या प्रमुख महानगरातील आजचा भाव
शहर सोने (22 कॅरेट) सोने (24 कॅरेट) चांदी (रु.प्रति किलो)
मुंबई 48560 52980 68100
पुणे 48560 52980 61400
नवी दिल्ली 48710 53140 68100
कोलकाता 48560 52980 68100
बंगळूरु 48610 53020 61400
हैदराबाद 48560 52980 61400
केरळ 48560 52980 61400
लखनऊ 48610 53030 68100
चेन्नई 49470 53970 61400
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा (Check Gold Purity)
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
इतर महत्वाच्या बातम्या
Share Market Opening Bell: शेअर बाजारात खरेदीचा जोर कायम, सेन्सेक्स-निफ्टीने गाठली उच्चांकी पातळी