Gold Rate Today : नोव्हेंबर महिना सुरु झाला की लग्नसराईला सुरुवात होते. या निमित्ताने ग्राहकांची बाजारात सोने खरेदीसाठी (Gold-Silver Rate) लगबग सुरु झाली आहे. सणसमारंभासाठी तसेच आर्थिक गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय म्हणून सोन्याचे नाणे, चांदीचे नाणे याकडे पाहिले जाते. अशातच बाजारात जर सोन्याचे दर कमी असतील तर ग्राहकांना या मौल्यवान धातूंची खरेदी करणे सोपे जाते. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,600 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 61,490 रुपये आहे.  

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  48,217 61,490
पुणे 48,208 61,420
नाशिक  48,208 61,420
नागपूर 48,208 61,420
दिल्ली 48,125 61,320
कोलकाता  48,143 61,310

जागतिक बाजारातील सोन्या-चांदीचे दर : (International Gold-Silver Rate) :

जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याची स्पॉट किंमत 0.35 टक्क्यांनी घसरून $1,689.01 प्रति औंस झाली. मागच्या आठवड्यातही सोन्याचे दर 0.41 टक्क्यांनी घसरले होते. सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीची स्पॉट किंमत आज 1.86 टक्क्यांनी घसरून 19.76 डॉलर प्रति औंस झाली आहे. तथापि, शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली.

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्ता तपासा (Check Gold Purity) :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.  

महत्वाच्या बातम्या : 

Share Market Opening Bell: सुरुवातीच्या घसरणीनंतर सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारात अस्थिरता राहण्याचे संकेत