Gold Silver Price Today : रशिया युक्रेन युद्ध अजूनही सुरुच आहे. जवळपास या युद्धाला एक महिना होत आला आहे. गेले काही दिवस सोन्या-चांदीचे दर अस्थिर पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान, मुंबईत आज सोन्याचा दर 350 रूपयांनी वाढून 22 कॅरेट सोन्याचा दर 47,750 रूपये झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 52,100 रूपये झाला आहे. मुंबईसह इतर शहरातील सोन्या-चांदीचे ताजे दर काय आहेत जाणून घ्या.


काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर ? 


बुधवारी, मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) वर एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचे दर 350 रूपयांनी वाढून 22 कॅरेट सोन्याचे दर 47,750 रूपये झाला आहे. तर चांदीचा दर एक हजार रूपयांनी घसरून प्रति किलो 67,692 रूपयांवर आला आहे. चांदीचा दर एक हजार रूपयांनी कमी झाला आहे. 


आज 23 मार्च जाणून घ्या तुमच्या शहरातील दर : 


मुंबई             47,750
पुणे               47,820
नाशिक         47,650   
नागपूर          47,800
दिल्ली           47,450
कोलकाता      47,560
चेन्नई             47,830


तुमच्या शहराचे दर तपासा :


तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 


खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा : 


तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA