Gold Silver Rate Today, 23 December 2023 : ऐन लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 23 डिसेंबर रोजी आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा 250 रुपयांची वाढ झाली आहे, तर 24 कॅरेट शुद्ध सोनं 230 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागलं आहे. मुंबईत आज सोन्याचा दर 22 कॅरेट सोन्यासाठी 5,800 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा 6,323 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ऐन लग्नसराईत सोन्याला झळाळी
24 कॅरेट सोन्याच्या किमतीत गेल्या एका आठवड्यात 0.61 टक्के बदल झाला आहे, गेल्या महिन्यात सोन्याच्या दरात 0.96 टक्क्यांनी घट झाली होती. आता ऐन लग्नसराईत मात्र, सोन्याला झळाळी मिळताना दिसत आहे. सोन्याच्या दरात वाढ होत असतानाही सोन्याची मागणी कमी झालेली दिसत नाही.
आज चांदीचा भाव काय?
सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. चांदीचा भाव आज 300 रुपयांनी वाढला आहे. आज चांदीची किंमत 79500 रुपये प्रति किलो आहे.
वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचे भाव पुढीलप्रमाणे आहेत.
- चेन्नईमध्ये सोन्याची किंमत स्थिर असून आजचा सोन्याचा दर 63550 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि एक किलो चांदीची किंमत 300 रुपयांनी वाढून 81000 रुपयांवर पोहोचली आहे.
- दिल्लीत सोनं 230 रुपयांनी महागलं असून आज सोन्याची किंमत 63380 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीची किंमत 79500 रुपये प्रति किलो आहे.
- मुंबईत सोन्याची किंमत 230 रुपयांनी वाढली असून आज सोन्याचा दर 63230 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि एक किलो चांदीची किंमत 79500 रुपये आहे.
- कोलकातामध्ये सोन्याची किंमत 230 रुपयांनी वाढली असून आजचा सोन्याचा दर 63230 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि एक किलो चांदीची किंमत 300 रुपयांनी वाढून 79500 रुपयांवर पोहोचली आहे.
महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)
- पुणे - 63230 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)
- नाशिक - 24 कॅरेट सोने 63260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nashik Gold Rate)
- नागपूर - 24 कॅरेट सोने 63230 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nagpur Gold Rate)
- कोल्हापूर - 24 कॅरेट सोने 63230 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolhapur Gold Rate)
सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सोन्याच्या दागिन्यांवर कॅरेट मूल्य दाखवले जाते, जे त्याची शुद्धता दर्शवते. 24 कॅरेट सोने पूर्णपणे शुद्ध असते. कमी कॅरेट सोन्यात इतर धातूंचे मिश्रण असू शकते. तसेच, सोन्याचे प्रतिस्थापन मूल्य विशिष्ट गुरुत्व परीक्षक हे उपकरण वापरून निर्धारित केले जाऊ शकते. हे उपकरण सोन्याचे वजन आणि तुम्ही दिलेले वजन यांच्यातील गुणोत्तर मोजते, ज्यामुळे तुम्हाला शुद्धता तपासता येते. सोन्याच्या शुद्धतेबद्दल तुम्हाला शंका असल्यास, तुम्ही स्थानिक सुवर्ण महामंडळ किंवा प्रमाणित ज्वेलर्सचा सल्ला घेऊ शकता.