Gold Silver Rate Today : दिवाळीनिमित्त (Diwali 2023) सर्वत्र खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे. दिवाळीत सोने-चांदी खरेदी (Gold Silver Rate Today) करणं खूप शुभ मानलं जातं. जर तुम्ही आज सोन्याचे दागिने (Gold Rate) किंवा चांदीची भांडी (Silver Rate) खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे सोने-चांदीच्या किमती (Gold Rate Today) कमी झाल्या आहेत.


गुड रिटर्न्सनुसार, आज 14 नोव्हेंबरला प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Price on 14 Nov 2023) 55,450 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, 18 कॅरेट सोने खरेदीची किंमत 45,370 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोने-चांदीचे दर शहरानुसार बदलतात.


मुंबईत सोन्याचा दर काय? ( Gold Rate in Mumbai Today )


आज मुंबईत सोन्याचा दर (Gold Rate in Mumbai) 100 रुपयांनी कमी झाला आहे. आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,490 रुपये प्रति तोळा आहे. तर दिल्लीतही सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 60,490 रुपये आहे. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,980 रुपये आहे.


चांदीची किंमत काय?


आज चांदीची किंमत (14 November 2023 Silver Price Today) 72,400 रुपये प्रति किलो आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत चांदीच्या दरात 600 रुपयांनी घट झाली आहे. चांदीच्या दरात घसरण होत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीची किंमत 74,000 रुपये प्रति किलो होती, ती आता 72,400 वर पोहोचली आहे.


देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट)


मुंबईमुंबईत सोने 100 रुपयांनी स्वस्त होऊन 60640 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Mumbai Gold Rate Today)


दिल्ली - 100 रुपयांनी स्वस्त होऊन सोने 60640 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आले आहे. (Delhi Gold Rate Today)


चेन्नई - सोने 100 रुपयांनी स्वस्त होऊन 60980 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Chennai Gold Rate Today)


कोलकाता - सोने 100 रुपयांनी स्वस्त होऊन 60490 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. (Kolkata Gold Rate Today)


महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)


पुणे - 60600 रुपये 490 रुपयांनी स्वस्त (Pune Gold Rate)


नाशिक - 60530 रुपये 90 रुपयांनी स्वस्त (Nashik Gold Rate)


नागपूर - 60490 रुपये 100 रुपयांनी स्वस्त (Nagpur Gold Rate)


कोल्हापूर - 60490 रुपये 100 रुपयांनी स्वस्त (Kolhapur Gold Rate)


सोन्याची शुद्धता कशी तपासायची?


सोने खरेदी करताना तुम्हाला त्याची शुद्धता देखील माहित असणे आवश्यक आहे. हॉलमार्कचा वापर सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी केला जातो. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहलेले असते. जर हे लिहिले नसेल तर मग शुद्धतेत कमी आहे.