Gold Rate Today :  आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंंच्या किंमती कमी-जास्त होत असतात. रशिया-युक्रेन युद्धाची परिस्थिती पाहता या युद्धाचे परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारासह भारतीय बाजारपेठेवरही होतान दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना पाहतोय. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 52,910 रूपयांवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर 63,380 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर नेमके काय आहेत ते जाणून घ्या. 

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर : 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  48,501 63,380
पुणे 48,501 63,380
नाशिक  48,501 63,380
नागपूर 48,501 63,380
दिल्ली 48,418 63,270
कोलकाता  48,437 63,300

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या :