Gold Rate Today : दिवाळीचा (Diwali 2022) सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या निमित्ताने ग्राहक बाजारात नवीन वस्तूंची, सोन्या-चांदीची खरेदी करतात. तर, आज आठवड्यातल्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना सोने-चांदी खरेदी (Gold-Silver Rate) करण्यासाठी चांगली संधी आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,400 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 59,340 रुपये आहे.   


तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 


मुंबईतील सोन्याचे दर


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम -  51,400
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम  - 47,117


1 किलो चांदीचा दर - 59,340


पुण्यातील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,400
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 47,117


1 किलो चांदीचा दर - 59,340


नाशिकमधील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,400
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 47,117


1 किलो चांदीचा दर - 59,340


नागपूरमधील सोन्याचे दर 


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,390


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 47,108


1 किलो चांदीचा दर - 59,340


दिल्लीमधील सोन्याचे दर  


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 51,300


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 47,025


1 किलो चांदीचा दर - 59,240


कोलकत्तामधील सोन्याचे दर


24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 51,320


22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 47,043


1 किलो चांदीचा दर - 59,260


जागतिक बाजारातील सोन्या-चांदीचे दर : 


जागतिक बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याची स्पॉट किंमत 0.35 टक्क्यांनी घसरून $1,689.01 प्रति औंस झाली. शुक्रवारीही सोन्याचा भाव 0.41 टक्क्यांनी घसरला होता. सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीची स्पॉट किंमत आज 1.86 टक्क्यांनी घसरून 19.76 डॉलर प्रति औंस झाली आहे. तथापि, शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच शुक्रवारी चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली.


खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा (Check Gold Purity) :


तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.


महत्वाच्या बातम्या :