Share Market Opening Bell: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. बँक, ऑटो आणि मेटलच्या शेअर दरात मोठी घसरण झाली. याचा परिणाम बाजाराच्या घसरणीवर दिसून आला. निफ्टी 17100 अंकांच्या खाली घसरला. 


मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 767.22 अंकांच्या घसरणीसह 57,424.07  अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 220.30 अंकांच्या घसरणीसह 17,094.35 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 764 अंकांच्या घसरणीसह 57,426.95 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 234  अंकांच्या घसरणीसह 17,079.95 अंकांवर व्यवहार करत होता. 


आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून विक्रीचा जोरदार सपाटा सुरू असल्याने बाजारात घसरण दिसत आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त टीसीएस कंपनीचा शेअर दर वधारला. तर, उर्वरित 29 शेअर दरात घसरण दिसून आली. तर निफ्टी 50 मधील फक्त कोल इंडिया कंपनीच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, उर्वरित 49 शेअर दरात घसरण दिसून आली. 


आज, सकाळी प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 648 अंकांच्या घसरणीसह 57543 अंकांवर व्यवहार करत होता. तर, एनएसईचा निफ्टी निर्देशांक 214 अंकांच्या घसरणीसह 17100 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. 


रुपयाची घसरण


डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. रुपयाने ऐतिहासिक नीचांक गाठला आहे. रुपया 82.68 प्रति अमेरिकन डॉलर झालाा आहे. रुपयात आणखी घसरण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


या वर्षात रुपयाच्या दरात 11 टक्क्यांची घसरण झाली आहे.  भारताची परकीय गंगाजळी दोन वर्षांच्या नीचांकी स्तरावर आली आहे. डॉलरची मागणी वाढली असून रुपयाची घसरण सुरू आहे. डॉलर आणखी वधारल्यास भारताकडून होणारी आयात महाग होणार आहे.