नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. 19 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याच्या दरात 360 रुपयांची घसरण होऊन ते 134120 रुपये 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत. 22 कॅरेट सोन्याचा दर देखील 122943 रुपयांवर आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्पॉट गोल्ड रेट, अमेरिकेच्या डॉलरच्या विनिमय दराती बदल आणि सोन्यावरील आयात शुल्क याचा सोन्याच्या दरावर परिणाम होत असतो.
Gold Rate in India : दुबईच्या तुलनेत भारतात सोनं महाग
भारतात सोन्याचे दर 2025 मध्ये 56654 रुपयांनी महागले आहेत. भारतात सोन्याचा दर दुबईच्या तुलनेत अधिक आहे. 19 डिसेंबरला भारतातील 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 134120 रुपये आहे. तर, दुबईतील दर 112816 रुपये आहे. म्हणजेच भारतात दुबईच्या तुलनेत सोनं 21304 रुपयांनी महाग मिळतंय. दुबईच्या तुलनेत भारतात 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दर अधिक आहेत.
अमेरिकेतली महागाई कमी होण्याच्या आकडेवारीसंदर्भातील अपेक्षा, याशिवाय डॉलर मजबूत झाल्यानं , सोन्याची कमी होत असलेली मागणी, अमेरिकेच्या फेड रिझर्व्हकडून व्याज दरात होत असलेली कपात. यामुळं सोन्याचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर कमी झाले आहेत.
एकीकडे सोन्याचे दर वर्षभरात 56654 रुपयांनी वाढले आहेत. त्यावेळी चांदीच्या दरात देखील वर्षभरात 114319 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा आजचा जीएसटीशिवायचा दर 201120 रुपये आहे. तर, जीएसटीसह चांदीचा दर 206346 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचे दर उच्चांकापेक्षा 914 रुपयांनी कमी आहेत. चांदीच्या दरातील वाढ औद्योगिक क्षेत्रातील मागणी वाढल्यानं झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, नवीकरणीयक्षम ऊर्जा आणि सौर ऊर्जा पॅनेल बनवण्यासाठी चांदीचा वापर होतोय.
देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर
पुणे आणि मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 360 रुपयांची घसरण होऊन ते 134120 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. 22 कॅरेट सोन्याचा मुंबईतील दर देखील 330 रुपयांनी कमी होत 122943 रुपयांवर पोहोचला आहे. तर, 18 कॅरेट सोन्याचा दर 270 रुपयांनी कमी होऊन 100590 रुपयांवर पोहोचला आहे.
अहमदाबाद येथील 24 कॅरेट सोन्याच्या दरात 360 रुपयांची घसरण होऊन ते 134300 रुपये 10 ग्रॅम आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची घसरण होऊन ते 123108 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, 18 कॅरेट सोन्याचा दर 270 रुपयांनी कमी होत 100725 रुपयांवर पोहोचला आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर : 133890 22 कॅरेट सोन्याचा दर:12273318 कॅरेट सोन्याचा दर: 100418
बंगळुरु
24 कॅरेट सोन्याचा दर : 134230 22 कॅरेट सोन्याचा दर:12304418 कॅरेट सोन्याचा दर: 100673
चेन्नई
24 कॅरेट सोन्याचा दर : 134510 22 कॅरेट सोन्याचा दर:12330118 कॅरेट सोन्याचा दर: 100883
हैदराबाद
24 कॅरेट सोन्याचा दर :134340 22 कॅरेट सोन्याचा दर:12314518 कॅरेट सोन्याचा दर: 100755
कोलकाता
24 कॅरेट सोन्याचा दर :133950 22 कॅरेट सोन्याचा दर:12278818 कॅरेट सोन्याचा दर: 100463
सुरत
24 कॅरेट सोन्याचा दर :134300 22 कॅरेट सोन्याचा दर:12310818 कॅरेट सोन्याचा दर: 100590