Gold Price Today : नवीन वर्षात सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. कारण गेल्या 6 वर्षात प्रथमच सोन्याच्या किंमतीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याची मोठी संधी ग्राहकांना मिळणार आहे. 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी ग्राहकांना आता 48 हजार 83 रुपये द्यावे लागणार आहेत. सोन्याचे दर हे 56 हजार 200 च्या आसपास पोहोचले होते. मात्र, आता 8 हजार रुपयांनी सोन्याच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांनी सोने खरेदीची एक चांगली संधी मिळाली आहे. ही गेल्या सहा वर्षांतील सोन्याच्या किंमतीतील सर्वात मोठी घसरण असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे 2021 मध्ये सोन्याच्या किंमतीत 4 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्या सोन्याचे भाव 8000 हजार रुपयांनी त्याच्या सार्वकालिक उच्चांकाच्या खाली दिसत आहेत.  ज्यावेळेस सोने प्रति औंस $1800 च्या खाली जाते, तेव्हा त्यात खरेदी होताना दिसते. गेल्या पंधरवड्याच्या अस्थिर व्यापाराच्या टप्प्यातही, $1820-1835 च्या श्रेणीतील नफा-वसुलीनंतर सोन्याच्या किंमतीत जोरदार वाढ झाली होती. सध्या सोन्याचा दर स्पॉट बाजारावर ठरत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. स्पॉट मार्केटच्या किंमतीत सोन्याचा कल सकारात्मक असल्याने व्यवहार होण्याची चिन्हे दिसत आहेत. अशावेळी गुंतवणूकदारांनी सोने खरेदीचे धोरण अवलंबावे असेही सांगण्यात आले आहे.  पुढीस 3 महिन्यात 1880 ते 1900 डॉलरवर जाऊ शकतात असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.


मोतीलाल ओसवाल कमोडिटी रिसर्चनुसार, सोन्याला $1760 च्या जवळपास सपोर्ट आहे. हा सपोर्ट जवळपास 1 महिन्यापासून आहे. हे लक्षात घेऊन, सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी $1760 - $1835 च्या रेंजवर लक्ष ठेवले पाहिजे. किंमतीतील चढउतारानुसार सोने खरेदीचे धोरण स्विकारले पाहिजे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. याबाबत आयआयएफएल (IIFL)सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता म्हणाले की,  MCX वर सोन्याची किंमत 48,000 रुपये प्रती 10 ग्रॅमवर आहेत.  त्याला 47,500 च्या वर समर्थन आहे. 47,800 -47,900 ची श्रेणी अल्प मुदतीच्या व्यापाऱ्यांसाठी सोने खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम श्रेणी आहे. मात्र, लवकरच सोन्याचे दर हे 49300 ते 49500 रुपये प्रती ग्रॅमवर जाऊ शकतात असे सांगितले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: