Gold Silver Rate: सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Rate) सातत्यानं वाढ होत आहे. याचा खरेदीदारांना मोठा फटका बसत आहे. या स्थितीमुळं सोन्या चांदीची खेरदी करावी की नको? असा प्रश्न ग्राहकांच्या मनात येत आहे. दरम्यान, गेल्या ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची वाढ झाली आहे.  


मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरात चांगली वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किमतीत सुमारे 2000 रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात चांदीच्या दरात 500 रुपयांची घसरण दिसून आली आहे. सप्टेंबर महिन्यात सोन्या-चांदीची स्थिती काय असणार? असा सर्वांना प्रश्न पडला असेल. तर जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती. 


ऑगस्टमध्ये सोन्याच्या दरात सुमारे 3 टक्क्यांनी वाढ 


ऑगस्ट महिन्यात मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली. ऑगस्टमध्ये सोन्याच्या दरात सुमारे 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात एक टक्क्याहून कमी घसरण दिसून आली आहे. परदेशातील बाजारात देखील सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. जिथे ऑगस्ट महिन्यात डॉलर इंडेक्सने एका वर्षातील नीचांकी पातळी गाठली. दुसरीकडे मध्यपूर्वेतील तणावाच्या स्थितीमुळं देखील सोन्याच्या दरात वाढ झालीय. दरम्यान, अमेरिकेची महागाई आणि अर्थव्यवस्थेची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपातीचा निर्णय घेते की नाही हे कळेल. तसेच, फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांनी आधीच पुष्टी केली आहे की सप्टेंबरमध्ये होणारी बैठक कमी केली जाऊ शकते. जर 0.25 किंवा त्याहून अधिकची घट दिसली तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण दिसू शकते. 


सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता


मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, 31 जुलै रोजी सोन्याचा भाव 70 हजार रुपयांच्या खाली होता आणि 69,655 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. जो ऑगस्टच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी वाढून 71,611 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. म्हणजेच ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या किमतीत 2.80 टक्के म्हणजेच 1,956 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, शुक्रवारी सोन्याच्या दरात 577 रुपयांची घसरण दिसून आली. सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.


महत्वाच्या बातम्या:


Gold-silver Rates today: ग्राहकांना दिलासा! आता 1 तोळा सोन्याचांदीला मोजावे लागतील 'एवढे' रुपये, जाणून घ्या ताजे दर