Gold Price : दिवसेंदिस सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी वाढ होताना दिसत आहे. काही केल्या सोन्याच्या दरातील वाढ कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. याचा मोठा फटका खरेदीदारांना बसत आहे. या वाढत्या दरामुळं सोन (gold) खरेदी करावं की नको असा प्रश्न खरेदीदारांच्या मनात येत आहे. दरम्यान, सोन्याचे दर 69000 रुपयांवर जाण्याची शक्यता देखील व्यक्त केली जातेय. त्यामुळं खरेदीदारांच्या खिशाला आणखी कात्री लागू शकते. मात्र, सोन्याच्या दरात एवढी वाढ का होतेय? याबाबतची माहिती जाणून घेऊयात.


दर वाढण्याचे कारणं काय?


सोन्याच्या दरातील वाढ सध्या कायम असल्याचं चित्र दिसत आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याला मजबूत मागणी आहे. या मागणीचा परिणाम दरांवर होत आहे. तसेच अमेरिकेत व्याजदरात कपात झाल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं 67350 रुपयांवर आहे. यामध्ये वाढ होऊन सोनं 69,000 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. 


सोन्याची गुंतवणूक ही उत्तम


सराफा बाारातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, MCX वर सोन्याचे दर हे  66,830 रुपयांवर पोहोचले आहेत. दरात सातत्यानं वाढ होत आहे. फेड रिझर्व्हने आपल्या व्याजरात कपात करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळं सोन्याच्या दरांवर परिणाम झाल्याचं चित्र दिसत आहे. सोन्याची गुंतवणूक ही उत्तम समजली जाते. या काळात काही लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करुन गुंतवणूक करत आहेत. कारण भविष्यात आणखी सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळं आत्ताची गुंतवणूक भविष्यात मोठा नफा मिळवून देणारी ठरणार आहे. 


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत व्याजदरात कपात होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळं सोन्याच्या दरात तेजी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यामुळं सोन्याच्या किंमती विक्रमी पातळी गाठतील अशी शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोन्याचे दर हे 69000 ते 70000 हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. या काळात लोक मोठ्या प्रमाणावर सोन्या चांदीची खरेदी करत असतात. मात्र, सध्या सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. याचा मोठा फटका खरेदीदारांना बसत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित होत आहे. अशातच आता पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


कर्ज घेण्यात परुषांपेक्षा महिला आघाडीवर, Gold Loan चं प्रमाण अधिक; घर खरेदीतही वाटा वाढला