खुशखबर! कमी दरात सोनं-चांदी खरेदीची संधी, आज दरात झाली एवढी घसरण

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण सध्या सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

Continues below advertisement

Gold Silver price : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण सध्या सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात वाढ झाली होती. मात्र, आज सोन्याच्या दरात घसरण झाल्यानं खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. आज  न्यूयॉर्क ते नवी दिल्लीपर्यंत सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण झाली आहे.

Continues below advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत 500 रुपयांपेक्षा जास्त घसरण दिसून आली. तर न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात प्रति औंस 12 डॉलरची घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

भारतात सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण

आज भारतात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 1 वाजून 13 मिनीटांनी सोन्याचा भाव 438 रुपयांच्या घसरणीसह 58 हजार 970 रुपयांवर व्यवहार करत आहे. मात्र, व्यवहारादरम्यान सोन्याचा भाव 58 हजार 880 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​आला आहे. मात्र, आज सोन्याचा भाव 59 हजार 209 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडला. शुक्रवारी सोन्याचा भाव 59 हा 408 रुपयांवर बंद झाला होता.

चांदीच्या दरातही घसरण 

दुसरीकडे, चांदीच्या दरातही घसरण झाल्याचे पाहायला मिळालं. दरात 500 रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर दुपारी 1 वाजून 17 मिनीटांनी चांदीचा भाव 412 रुपयांनी घसरुन 70 हजार 875 रुपयांवर आला आहे. व्यवहारादरम्यान चांदी 507 रुपयांनी स्वस्त होऊन 70 हजार 780 रुपयांवर पोहोचली. मात्र, आज चांदी 71 हजार 200 रुपये प्रतिकिलोवर उघडली. शुक्रवारी चांदी 71 हजार 287 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

न्यूयॉर्कमध्ये सोन्या-चांदीचे भाव घसरले

अमेरिकेत, न्यूयॉर्कच्या कॉमेक्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव प्रति औंस $18.10 च्या घसरणीसह $1,923.40 प्रति औंसवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, सोन्याच्या स्पॉटची किंमत प्रति ऑन $ 22.18 च्या घसरणीसह $ 1,910.64 वर व्यापार करत आहे. चांदीच्या दरातही घसरण दिसून येत आहे. चांदीचा भावी भाव 0.87 टक्क्यांनी घसरून $22.70 प्रति औंस आहे. चांदीची स्पॉट किंमत 0.69 टक्क्यांच्या घसरणीसह $22.56 प्रति ऑनवर व्यवहार करत आहे.

तज्ज्ञांचं म्हणणं काय? 

आज सोन्याच्या किंमती घसरल्याच्या मुद्यावर बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि चलन प्रमुख अनुज गुप्ता म्हणाले की, अमेरिका, इजिप्त आणि इस्रायलने दक्षिण गाझामध्ये युद्धबंदी जाहीर केली आहे. त्यामुळं सोन्याच्या किमती आज दबावाखाली आहेत. दरम्यान, आज जरी सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी, येत्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Gold Silver Rate: सोन्या चांदीच्या दरात तेजी, खरेदीदारांच्या खिशाला कात्री; जाणून घ्या महत्वाच्या शहरातील आजचे दर

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola