Viral Video: देशात असा कोणता रस्ता (Road) राहिला नसेल जिथे वाहनांची रहदारी नाही. शहर असो किंवा खेडं, सर्वांकडे आता स्वत:च्या गाड्या (Vehicle) आल्या आहेत. एक काळ असा होता, जेव्हा फक्त श्रीमंतांकडेच गाड्या असायच्या. पण आज सर्वसामान्यांकडेही गाड्या पाहायला मिळतात आणि त्यामुळेच रस्त्यांवरील रहदारी देखील वाढली आहे.
गाड्यांची संख्या दिवसेंदिवस इतकी वाढत आहे की, वाहतूककोंडी (Traffic) सारख्या समस्या नेहमी जाणवतात. वाढत्या वाहनांमुळे लोकांसाठी रस्ता ओलांडणं देखील कठीण होऊन बसलं आहे. पण तुम्हाला तर माहीत आहेच की, भारतात जुगाडू लोकांची संख्या कमी नाही. तर याद्वारे ते कठिणातलं कठीण काम देखील अगदी काही वेळात करुन टाकतात, असाच एक रस्ता ओलांडतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.
माणसाने रस्ता ओलांडावा तरी कसा?
सोशल मीडियावर तुम्ही अनेक जुगाड पाहिले असतील. पण सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही मान्य कराल की, जुगाड करण्यात भारतीयांशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभा असल्याचं दिसतं. तो बराच वेळपासून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र रस्त्यावर भरधाव वेगात धावणारी वाहनं थांबण्याचं काही नाव घेत नाहीत. प्रत्येकजण आपली गाडी रस्त्यावरुन पळवत आहे. अशा स्थितीत रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेल्या व्यक्तीने काय करावं?
गुडघ्यावर बसून ओलांडला रस्ता
सहसा, अशा परिस्थितीत लोक ट्रॅफिक सिग्नल लाल होण्याची वाट पाहतात. पण या व्यक्तीने आपल्या डोक्याचा वापर केला आणि एक शानदार शक्कल लढवली. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, ती व्यक्ती शांतपणे रस्त्याच्या कडेला गुडघ्यावर बसते आणि मग रेंगाळत रस्ता ओलांडू लागते. या व्यक्तीला पाहून लोकांना वाटतं की त्याला चालता येत नसावं. आता या व्यक्तीला असं पाहून लोकांना त्याच्यावर दया आली आणि सर्वांनी आपली गाडी थांबवली. एका व्यक्तीने तर आपल्या कारमधून बाहेर येत सर्व गाड्या थांबवल्या आणि या माणसाची रस्ता ओलांडण्यात मदत केली.
निनजा टेक्निक पाहून लोक प्रभावित
हा माणूस जसा रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला पोहोचतो, तो सरळ उभा राहतो आणि तिथून पळून जातो. आता हे पाहून त्याची मदत करणारा व्यक्ती पण चकित होतो. आपल्याला मुर्ख बनवलं गेलं आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि तोही त्या माणसाच्या मागे धावू लागतो. सोशल मीडियावर रस्ता ओलांडण्याच्या या निनजा टेक्निकचं लोक फार कौतुक करत आहेत.
हेही वाचा:
Trending: अंगावर कोळी पडल्याने घाबरली महिला; चालत्या कारमधून घेतली उडी अन् पुढे...